*उदयगिरी अकॅडमीची विद्यार्थीनी कु.पल्लवी फड हिची महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये निवड* (उदगीर) उदयगिरी अकॅडमीची माजी विद्यार्थीनी कु.पल्लवी भागवत फड हिची रत्नागिरी पोलीस पदी नुकत्याच घेण्यात आलेल्या पोलीस भरतीमधे निवड झाल्याबद्दल हिचा सत्कार उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा.गोपाळकृष्ण घोडके सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पल्लवीची मोठी बहीण सूप्रिया फड सुद्धा उदयगिरी अकॅडमीचीच विद्यार्थिनी होती. ती देखील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवून गेल्या 4 वर्षापासून वन विभागामधे चांगल्या पदावर कार्यरत आहे. या सत्कार प्रसंगी प्रा.गोपाळकृष्ण घोडके प्रा. संतोष पाटील, प्रा.धनंजय पाटील, प्रा. श्रीगण रेड्डी हे उपस्थित होते. तीच्या निवड बद्दल प्रा. ज्योती खिंडे प्रा. मीना हुरदळे , प्रा. नंदिनी निटुरे , प्रा.निवेदिता भंडारे यांनी अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
