बदलापूर, चाकूर आणि कोलकोता येथील गुन्हेगारांवर कार्यवाही साठी महीला काँग्रेस चे धरने उदगीर =आज मुली कुठेच सुरक्षित राहिल्या नाहीत, महिलांची सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे आणि या संदर्भात शासन प्रशासन कुचकामी ठरत आहे लोकांना व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही म्हणत लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे धरणे आंदोलन करण्यात आले बदलापूर येथील घटनेच्या प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्टात चालवण्यात यावे दोषींना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, सरकारने पारीत केलेले शक्ती बिल केंद्राकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे या बिलाचा कायदा केल्यास बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देता येणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करावा तसेच या प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी न घालता कडकं शासन करावे भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत यासाठी यथोचित पाऊले उचलावीत. अश्या मागण्या या धरणे आंदोलनात करण्यात आल्या. या प्रसंगी लातूर जिल्हा महिला कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षा श्रीमती शिलाताई पाटील, तालुका अध्यक्षा सौ सरोजाताई बिरादार, शहर अध्यक्षा सौ झिल्ले ताई, सौ चारुशीला पाटील, सौ ज्योती ताई डोळे, बालिका मुळे, जळकोट तालुका अध्यक्षा मंजुषाताई पांचाळ, बबिता भोसले, रेखाताई कानमंदे, संध्याताई पटवारी, प्राजक्ता ताई शेरे, शिवाजी हुडे, मधुकर एकुरकेकर, श्रीकांत पाटील, मंजुर खान पठाण, पद्माकर उगिले, आशिष पाटील, नाना ढगे, दत्ता सुरनर, अजित शिंदे, अहमद सरवर, ओमकार गांजुरे, मोहन पाटील, प्रमोद पाटील, संतोष बिरादार, श्रीनिवास एकुरकेकर, लक्ष्मणराव सोनवले, बिपीन जाधव, विवेक जाधव, परमेश्वर अडगुळवाड, प्रीतम गोखले, सोनू पिंपरे, कनिष्क शिंदे, सद्दाम बागवान, राजेश्वर भाटे, गोविंद भालेराव, शिवाजी देवनाळे, मुंताजीब खाजा, विकास देशमाने, शंकर मोरे, सतीश पाटील मानकीकर सह कांग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
