*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर येथील विविध इमारती, विकास कामांचे लोकार्पण* * सुसज्ज इमारतींमुळे उदगीर नगरीच्या वैभवात भर * अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण * उदगीर भूमिगत गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन उदगीर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उदगीर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील सुसज्ज प्रशासकीय इमारती, अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजना, कौळखेड व गुडसूर येथील वीज उपकेंद्रांचा यामध्ये समावेश आहे. तसेच उदगीर शहरातील भूमिगत गटार योजनेचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी. एस. पांढरे, अधिक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. *तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय* उदगीर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 2 हजार 876 चौरस मीटर आहे. यामध्ये तळ मजल्यावर वाहनतळ (पार्किंग), पहिल्या मजल्यावर तहसीलदार यांचा कक्ष, कॉन्फरन्स हॉल, कोर्ट रूम यासह विविध कक्ष, दुसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष, ईव्हीएम स्ट्राँग रूम, बैठक सभागृह आणि इतर कक्ष आहेत. तिसऱ्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय असून उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षासह विविध कक्ष, कोर्ट रूम, कॉन्फरन्स हॉल आहे. या इमारतीसाठी सुमारे 10 कोटी 19 लाख रुपये खर्च झाला आहे. *पंचायत समिती इमारत* उदगीर पंचायत समितीच्या नूतन इमारतीमध्ये एकूण चार मजले आहेत. एकूण जवळपास 3 हजार 112 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीची उभारणी सुमारे 20 कोटी 17 लक्ष रुपये निधीतून करण्यात आली आहे. गट विकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी यांचे सुसज्ज कक्ष, बैठक सभागृह या इमारतीमध्ये तयार करण्यात आले आहेत. *उदगीर प्रशासकीय इमारत* उदगीर येथे सुमारे 14 कोटी 95 लाख रुपये निधीतून तीन मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे 5 हजार 532 चौरस मीटर असून तळ मजल्यावर वाहन तळ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक दुय्यम निबंधक, कृषि विभागासह विविध शासकीय विभागांची कार्यालये या तीन मजली प्रशासकीय इमारतीमध्ये असतील. *उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन इमारत* उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि उदगीर पोलीस स्टेशनसाठी सुमारे 32 कोटी 54 लक्ष निधीतून दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ जवळपास 10 हजार 957 चौरस मीटर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या इमारतीमध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर उदगीर शहर पोलीस स्टेशन आहे. तर दुसऱ्या मजल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. ही इमारत भूकंप रोधक असून सोलार, अग्निशमन यंत्रणा, अत्याधुनिक कारागृह, बैठक कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष आदी सुविधांनी सज्ज आहे. *गुडसुर आणि कौळखेड वीज उपकेंद्राचे लोकार्पण* गुडसुर आणि कौळखेड येथे उभारण्यात आलेल्या 33/11 केव्ही वीज उपकेंद्रांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण केले. गुडसुर येथील उपकेंद्रामुळे गुडसुर, डाऊळ, हिप्परगा, डोंगरशेळकी, कल्लुर व इस्मालपुर येथील ग्राहकांना सुरळीत आणि योग्य दाबाने विद्युत पुरवठा करणे शक्य झाले आहे. तसेच कौळखेड येथील उपकेंद्रामुळे जानापुर, शिरोळ, कौळखेड, मल्लापुर, गुर्धाळ, कुमदाळ व जवळपासच्या वाड्या-तांडे यांना उच्च दाबाने वीज पुरवठा होत आहे. *अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण* उदगीर शहरासाठी पुढील 30 वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेच्या 106 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. या योजनेसाठी नांदेड जिल्हातील उर्ध्व मण्यार प्रकल्पातील पाणी आरक्षित करण्यात आले. तसेच याठिकाणी उद्भव विहीर घेवून उदगीर शहरासाठी पाणी आणण्यात आले. या योजनेतून शहरात सुमारे 14 हजार नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच बनशेळकी तलाव व हकनकवाडी जलशुध्दीकरण केंद्र येथे 500 के. व्ही. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या योजनेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. *उदगीर शहर भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन* महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उदगीर शहर भूमिगत गटार योजनेच्या एकूण सुमारे 349 कोटी 88 लाख रूपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार उदगीर शहर भूमिगत गटार योजनेच्या टप्पा-1 साठी 161 कोटी 4 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
Popular posts
शिवसेना उदगीर नगरपालिका स्वबळावर लढणार= मा. आमदार सुधाकर भालेराव 👉 नगरविकास खाते एकनाथ शिंदे कडे असल्याने शिवसेना उदगीर चा विकास भूतो न भविष्यती करू 👉 नगरपालिका हद्दीतील भ्रष्टाचार मिटवणार 👉 मुस्लिम समाजाला सोबत घेऊन विकास करू 👉 मागील काळातील विकास माझ्या कार्यकाळातील 👉 केलेल्या कामाची प्रसिद्धी न केल्याचे खंत 👉उदगीरकराच्या हितासाठी,सर्वांगीण विकासासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो असून मी आता गप्प बसणार नाही 👉 उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढवणार असून जनतेनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करतील असे सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे
Image
कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
उदगीर नगरपालिकेवर युतिचा झेंडा फडकेल = बस्वराज पाटील मुरूमकर 👉 आत्ताच विरोधकांची झोप उडाली उदगीर= उदगीर नगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकणार असल्याने विरोधकांची झोप उडाली असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरूमकर यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे उदगीर येथे युतीच्या उमेदवारा ची माहिती देण्यास बोलावलेल्या पत्रकार परिषदे नंतर उदगीर समाचार सोबत बोलताना पाटील म्हणाले की उदगीर नगर पालिके वर युती चा झेंडा फडकणार असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,आज विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत, देशात भाजप्,राज्यात युती चे सरकार असून आम्ही जो विकास केला आहे ते जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, उदगीर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदा वर स्वाती सचिन हुडे व आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या न भूतो न भविष्ती अशा मतांनी विजयी होतील यात आम्हाला शंका नाही असेही ते म्हणाले या वेळेस आ संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. संजय बनसोडे, मा. आ.गोविंद केंद्रे सह अनेक मान्यवर उपस्थित होते
Image
उदगीर नगरपालिकेत सत्ता पालट ? 👉 अनेक माजी नगरसेवकाची नाराजी भोवणार ! उदगीर:- उदगीर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून आता नामांकन दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी चालू असून काही पक्ष हवेत आहेत की आम्ही जो उमेदवार दिला तो निवडून येईल हे त्यांचे भ्रम दिसत असून जश्या निवडणूक निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तश्या प्रभागात जाऊन तेथील मतदाराच्या ही प्रतिक्रिया घेतल्या असत्या तर चांगले झाले असते असे मतदार बोलत आहेत या वरून ज्या माजी नगरसेवका बद्दल रोष आहेत त्याचा फटका अनेक पक्षाला बसण्याची शक्यता दिसत आहे,शहरात होत असलेल्या गुप्त बैठकीचा सारांश घेतला तर ज्या पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार सक्षम असेल त्याचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे दिसत असून पुढील दोन दिवसात हे स्पष्ट होईल
ठरलं भाजप राष्ट्रवादी ? नगराध्यक्ष भाजप, भाजप 18 राष्ट्रवादी 19 अन्य 3 फॉर्म्युला? उदगीर:- उदगीर नगरपालिका निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांची युती संदर्भात फायनल बैठक झाल्याची चर्चा असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पद भाजप ला तर त्या बद्दल राष्ट्रवादी ला एक नगरसेवक जास्त असल्याची चर्चा सूत्र करत आहेत तर राष्ट्रवादी ला प्रभाग 1,2,3,4,5,6,10,11,12 आणि 13 तर भाजप ला प्रभाग 7,8,9,14,15,16,17,19,20 मिळेल अशी चर्चा आहे,तर 18 मधून 2, 20 मधून 1 ही जागा अन्य देण्यात येईल अशी ही सूत्रांची माहिती असून हा अंदाज आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे , होऊ शकते उदगीर समाचार चा अंदाज खरा ठरतो किंवा खोटा हे लवकरच समजेल