राष्ट्रपती दौऱ्या निमित्त उदगीर येथील वाहतूक मार्गात बदल उदगीर= माननीय महामहिम राष्ट्रपती भारत सरकार है व इतर अतिमहत्वाचे व्यक्ती त्यांचे हस्ते विश्वशांती बौध्द विहार, उदगीर लोकार्पण सोहळा व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय जवळील सभा अनुषंगाने उदगीर दौ-यावर येणार असल्यामुळे त्यांचे सभेला लातूर जिल्ह्यातुन व बाहेर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात वाहनासह जनसमुदाय येणार असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लातूर यानी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे (२) नुसार सर्व माननीय महामहिम राष्ट्रपती, भारत सरकार यांच्या दौ-याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उदगीर जिल्हा लातूर हद्दीमध्ये दिनांक ०४/०९/२०२४ रोजी दुपारी ०५.०० वा. ते १८.०० वा. विश्वशांती बौध्द विहार उदगीर लोकार्पण सोहळा व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय जवळील सभास्थळाकडे येणा-या जड व मालवाहतुक करणारी मोठी वाहने व इतर सर्व प्रकारच्या वाहनांस प्रतिबंध करून खालील प्रमाणे इतर पर्यायी मार्गाचा वापर करण्यास भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे (२) अधिसुचना निर्गमित केली आहे. 👉. लातूरकडुन उदगीर शहरात येणारे जड व माल वाहतुक करणारे वाहनांना शासकीय विश्रामगृह, उदगीर पासुन उदगीर शहरात येणार मार्ग बंद करण्यात आला असुन त्यांनी रिंग रोड मार्गाचा वापर करावा. 👉. बिदर ते उदगीर मार्गे लातूर जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना बाळासाहेब ठाकरे. चौक उदगीर येथुन शहरात येणारा मार्ग बंद करण्यात आला असुन ते रिंग रोड मार्गे लातूरकडे जातील. 👉. बिदर ते उदगीर मार्ग अहमदपुर जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक. उदगीर येथुन पुढे शहरात जाणारा मार्ग बंद करण्यात आला असुन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक जळकोट रोड घोणसी- वाढवाणा पाटी मार्गे अहमदपुर कडे जातील. 👉. अहमदपुर तै उदगीर मार्गे बिदर जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना वाढवणा पाटी येथुन पुढे उदगीरकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असुन त्यांनी वाढयाणा पाटी घोणसी जळकोट रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर मार्गे बिदर कडे जातील. 👉 देगलुर ते उदगीर मार्ग बिदर. निलंगा लातूर कडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक. बाळासाहेब ठाकरे चौक बिदर रोड. रिंग रोड मार्ग बिदर निलंगा व लातूर कडे जातील उपरोक्त आदेश दिनांक ०४/०९/२०२४ रोजीचे सकाळी ०५.०० वा. ते १८.०० वा. पर्यंत वाजेपर्यंत अंमलात राहतील असे प्रशासनाने जाहीर केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी