शिवाजी सोसायटी मधे रस्त्याची चाळण 👉 लिंबोटी पाइप लाइन साठी फोडलेले रस्ते तसेच,गुत्तेदार बिल घेऊन फरार ? 👉 संबंधित विभागाचे नगर सेवक ही मूग गिळून गप्प ? उदगीर:- शिवाजी सोसायटी येथे लिंबोटी पाइप लाइन साठी सिमेंट रस्ते फोडून पाइप लाइन केली ,संबंधित गुत्तेदाराणे संबंधित रस्ते भरून देण्याचे आदेश असताना ही रस्त्यावरचे उकरेलेले खड्डे तसेच ठेऊन गुत्तेदार फरार झाल्याने या रस्त्यावर दररोज अपघात होऊन अनेक जण जखमी होत असताना नगर पालिकेला या खड्ड्या कडे बघण्यास वेळ नसल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी


