*श्री.एस.एम.देशमुख सर असणार उदगीर येथे होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक* उदगीर:- आज वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांची उदगीर ची टीम सर्वश्री सचिन शिवशेट्टे (विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद), बिभीशन मद्देवाड अध्यक्ष रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान, श्रीनिवास सोनी अध्यक्ष उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद,अर्जुन जाधव हल्ला विरोधी कृती समितीचे उदगीर तालुका समन्वयक,सुनील हवा सचिव उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषद, सिद्धार्थ सुर्यवंशी सचिव मराठी पत्रकार संघ उदगीर या सर्वांनी आज वडवणी मध्ये भेट घेऊन उदगीर येथे होत असलेल्या 20 ऑक्टोंबर 2024 रोजी पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य सम्मेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आले. श्री.एस.एम.देशमुख सर यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारल्या बद्दल त्यांचे व डिजिटल मिडिया परिषदेचे नव्याने प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अनिल वाघमारे यांचा संयोजक समितीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देत आभार व्यक्त करण्यात आले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
