इंजि.विश्वजीत गायकवाड यांच्या विजय संकल्प मेळाव्याने अनेकाची उडवली झोप! उदगीर : जळकोट येथील सामाजिक संघटना अविनाश मित्रमंडळाच्या वतीने आयोजित इंजि. विश्वजीत गायकवाड यांच्या विजय संकल्प मेळाव्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .या मेळाव्यातून इंजि.विश्वजीत गायकवाड यांनी आपण उदगीर विधान सभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले . सामान्यांना आवश्यक अशा जनसुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य आपण सेवक म्हणून करीतच राहणार असल्याचे सांगितले . येत्या विधानसभा निवडणुकीत विश्वजीत गायकवाड यांना विजयी करण्याचा संकल्प अविनाश मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला . प्रथम जळकोट मध्ये प्रवेश करताच विश्वजीत गायकवाड यांचा जेसीबी द्वारे फुलांचा हार घालून आकाशातून पुष्पवृष्टी करून केले गेले .यावेळी विश्वजीत दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणाने आकाश दुमदुमले . इंजि विश्वजीत गायकवाड यांचा अविनाश भाऊ मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना विश्वजीत गायकवाड यांनी ग्रामीण भागात सामान्य व्यक्तींना आवश्यक अशा गरजांची पूर्तता झालीच नसल्यामुळे खरा विकास झाला नसल्याचे सांगितले .जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयातील रक्त तपासणी मशिन बंद आहे , त्यामुळे रुग्नाचे रक्त उदगीरला घेऊन जाऊन तपासणी करुन आणावे लागते , एक्सरे मशिन चलविण्यासाठी कर्मचारी नसल्याने लाखो रूपयाची मशिन धुळखात पडली आहे आणि रुग्णांना दुसरीकडे जाऊन एक्सरे काढावा लागत आहे . पुढे बोलताना गायकवाड म्हणाले सध्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेची अत्यत बिकट परिस्थिती आहे.बसण्यासाठी विद्यार्थ्याना सोय नाही,शौचालय काही ठिकाणी उपलब्ध आहेत मात्र ती बंद पडली आहेत.विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत आशा अनेक मूलभूत सेवा उपलब्ध नाहीत.जिल्हा परिषद शाळा मध्ये सर्वसामान्य शेतक-याचे लेकरे शिकतात म्हणून या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा आरोप केला . आपण प्रत्येक गावात दहा रोपाची लागवड करून त्याची जोपासना करनार, जवळपास पंचवीस हजार विद्यार्थ्यांना बॅगा,पेन, पेन्सिल,वही असे शैक्षणिक साहित्य वाटप केल आहे , द्विव्यांगाना सायकल दिली असे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य आपण सेवक म्हणून करत असून यापुढेही करणार असल्याचे इंजि.विश्वजित गायकवाड यांनी सांगितले . यावेळी व्यासपीठावर माजी खासदार सुनिल गायकवाड़ अविनाश वाघमारे,सिद्धार्थ सुर्यवंशी, आदि सह अविनाश भाऊ मित्रमंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंजि विश्वजित गायकवाड यांच्या झांजावत प्रचाराने अनेकांची झोप उडाल्याचे चित्र सद्या मतदार संघात दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
