*उदगीरात पुन्हा संजय पर्व; उदगीरकरांची विकासाला साथ* 👉*महायुतीचे उमेदवार ना.संजय बनसोडे ९३ हजार २१४ मतांनी विजयी* *👉हा विजय जनतेला समर्पित : ना. संजय बनसोडे* *उदगीर* : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी तब्बल 1 लाख 52 हजार 38 मतदान घेतले तर आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सुधाकर भालेराव यांना 58 हजार 824 मते पडली. ना.संजय बनसोडे यांनी तब्बल 93 हजार 214 मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी 2 लाख 16 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सर्व मतदारांनी ना. संजय बनसोडे यांनी केलेल्या विकास कामांची आणि त्यांच्या जनसंपर्काची पावती देत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात 13 उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच लढत होईल, हे चित्र कायम राहिले होते. या निवडणुकीत अनेकांनी ना.बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन पक्षप्रवेश केला. मागील ५ वर्षात ना.संजय बनसोडे यांनी उदगीर व जळकोट मतदार संघात केलेल्या विकास कामाच्या जोरावरच त्यांनी जनतेला आपणास पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले होते. मतदार संघात सर्वसामान्यांच्या दारापर्यंत विकासाची गंगा ना.बनसोडे यांनी पोहचवल्याने त्यांचा महाविजय झाला आहे. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 👉हा विजय जनतेला समर्पित.. ना संजय बनसोडे ना.संजय बनसोडे यांनी लातूर जिल्ह्यात मोठे मताधिक्य घेतले आहे. ना. संजय बनसोडे हे विकासामुळे व त्यांचा जनसंपर्क असल्यामुळे अग्रणी राहिले. इतक्या मोठ्या विजयानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधताना हा विजय माझ्या विकास कामाचा आणि जनतेचा आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला मी पात्र राहीन आणि भविष्यातही जनतेच्या विकास कामासाठी सदैव तत्पर राहीन. असा विश्वास दाखवला आहे. तसेच हा विजय जनतेला समर्पित केला आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे मला इतके जास्त मताधिक्य मिळाले आहे. मी जनतेचा कायम ऋणी राहणार असुन आपण जनसेवक म्हणूनच मी भविष्यात काम करणार असल्याचे ना.बनसोडे यांनी सांगितले आहे. 👉 ना.संजय बनसोडे यांचा महाविजय झाल्यानंतर त्यांची आय.टी.आय. काॅलेजपासुन शहरातील मुख्य रस्त्याने त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ना.संजय बनसोडे यांनी शहरातील महापुरूषांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर विविध चौकात ना.बनसोडे यांचे कार्यकर्त्यांनी मोठे पुष्पहार घालून व पुष्पवृष्टी करून नामदार संजय बनसोडे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
