उदगीर 25 टेबल वर 26 फेरीत मतमोजणी संपन्न होणार उदगीर:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि. २०.११.२०२४ रोजी उदगीर विधानसभा मतदार संघात ६७.११% मतदान झाले असून मतमोजणी दि. २३.११.२०२४ रोजी शासकीय आय टी आय, देगलूर रोड उदगीर येथे सकाळी ८.०० वाजता सुरू होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांनी कळवले आहे. सदर मतमोजणी साठी एकूण २५ टेबल चे नियोजन करण्यात आले असून असून त्यापैकी १४ टेबल EVM यंत्रातील मतमोजणीकामी, ९ टेबल टपाली मतपत्रिकांसाठी तसेच २ टेबल ETPBS द्वारे मतमोजणीसाठी असतील मतमोजणी साठी प्रत्येक टेबलवर सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक नेमण्यात आले असून एकूण २६ फेरीमध्ये मतमोजणी संपन्न होईल साधारणतः मतमोजणी कामी ३२५ कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय पुरेसा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सदर मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून ओळखपत्र प्राप्त व्यक्तींना, अधिकारी- कर्मचारी यांनाच प्रवेश असेल. सुरक्षाकामी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यन्वीत आहे. प्रत्येक उमेदवारांना जास्तीत जास्त २५ मतमोजणी प्रतिनिधी या कामी नेमता येतील. याशिवाय कोणीही अनाधिकृत व्यक्तींना मतमोजणी कक्षात प्रवेश असणार नाही. मतमोजणी केंद्राबाहेरील वाहतूक व्यवस्थापन पोलिसाकडून करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेश द्वारावरुनच आत मध्ये ओळखपत्र तपासून पोलीस प्रवेश देतील पत्रकारांसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल फोन इलेक्ट्रानिक उपकरण नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याकामी सर्व उमेदवार, उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी, उमेदवारांनी नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी, पत्रकार' यांनी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांनी कळवले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी