मतदानासाठी पैसे देणारे 3 ,घेणारे 2 वर गुन्हा दाखल उदगीर= उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्या कडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी वेंकटेश रघुनाथ दंडे विस्तार अधिकारी पंचायत समिती उदगीर यांच्या फिर्यादवरून पएनसी नं.1058/2024 कलम 173,3(5) भारतीय न्याय संहीता ने 1) संदीप वैजिनाथ फड 2) प्रशांत देविदास राठोड 3) तीरुपती माधव केंद्रे सर्व रा.हकनकवाडी ता.उदगीर 4) पारुबाइ गंगाराम राठोड व 5) ललीता नामदेव राठोड दोन्ही रा.राठोडतांडा 18/11/2024रोजी दुपारी 02.00वा सुमारास गंगाराम मेंदु राठोड याचे घरासमोर राठोड तांडा ता.उदगीर यानी वर नमुद ता.वेळी व ठिकाणी यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन राष्ट्रवादी पक्ष चिन्ह घडयाळ या पक्षाला मतदान करण्यासाठी वरील आरोपी 1 ते 3 यांनी विधानसभा निवडणुक 2024 मधील उदगीर विधानसभा मतदार संघ 237(अ.जा) अनुशंगाने आचारसहिंता लागु असल्याचे जाणीव असुन सुद्धा मतदाराला राष्ट्रवादी पक्ष चिन्ह घडयाळ यास मत देण्याकरीता लाच देत होते व आरोपी क्रमांक 4 ते 5 हे मत देण्याकरीता लाच स्विकारुन अचार संहितेचा भंग केला वरुन गुन्हा दाखल केला असून पो नि राजकुमार पुजारी सो यांचे आदेशाने अदखलपात्र अहवाल दाखल करुन पुढील चौकशी व कार्यवाहीस्तव पोउपनि कदम यांचे कडे देण्यात आला.
• श्रीनिवास मदनलाल सोनी