वंदे भारत सोडा शेतकऱ्याच्या पिकविमा,सोयाबीन भावा बदल थोड बोला :- मा.कृषि उतपन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव हुडे उदगीर:- उदगीर तालुक्यातील शेतकरी रहातात त्यांना त्यांच्या मालाला भाव पाहिजे पिक विमा पाहिजे है सोडून उठ सूट वंदे भारत रेल्वे चालु करतो,मेडिकल कॉलेज चालु करतो हे बोलणं तुम्हाला शोभत नसून आपण मतदार संघात भौतिक विकास काय केलंत हे सांगावे असे मत कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती शिवाजीराव हुडे यानी व्यक्त केले आहे शिवाजीराव हुडे बन शेळकी येथे सुधाकर भालेराव यांच्या विशाल प्रचार सभेत बोलत होते ,ते म्हणाले की उदगीर जळकोट मतदार संघातील 90% च्या वर मतदार हे शेतकरी कष्टकरी आहेत याना भौतिक सुविधा पाहिजेत ,शेतकऱ्याच्या सोयाबीन ला 4000 ,4100 रू भाव आहे ,शेतकऱ्याचा लागवड खर्च ही निघत नाही,अतिवृष्टी झाली शेतकऱ्याला एक रुपया पिक विमा मिळाला नाही हे बोलणे सोडून मी विकास केला, बिल्डींड बांधल्या,वंदे भारत रेल्वे चालु करतो ,मेडिकल कॉलेज चालु करतो असे गाजर दाखवत आहेत,साहेब वंदे भारत रेल्वे ने गरीब सामान्य शेतकरी एक पोते सोयाबीन विकून प्रवास करेल का,तुम्ही अलिबाग ला न्हेतो म्हणालात तर एक वेळेस येईल पण पुढे ,जे शेतकऱ्याच्या हिताचे आहे ते बोलणे सोडून विकास केला विकास केला म्हणत आहात,विकास कोणाचा झाला हे मतदार संघात होत असलेल्या पैश्याच्या पावसावरून मतदार ओळखत आहेत, आता या मतदार संघातील मतदार भुल थापाना बळी पडणार नसून तो सर्व काही ओळखून मतदान करेल असे मत शिवाजीराव हुडे यानी व्यक्त केले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
