ना.संजय बनसोडे यांच्या शहरातील पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद *उदगीर* : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर व जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचारात आघाडी घेतली आहे. उदगीर शहरातील आडत लाईन व शहरातील मुख्य रस्त्यावरून नामदार संजय बनसोडे यांची प्रचार रॅली निघाली होती. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे फटाके फोडून शाल व पुष्पहार देऊन सत्कार करुन नामदार संजय बनसोडे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या पाच वर्षात उदगीर जळकोट मतदार संघाचा कायापालट करणारे विकासरत्न आमदार म्हणून संजय बनसोडे यांनी सबंध महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या हाकेला धावून जाणारे नामदार संजय बनसोडे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य, वंचित व कष्टकऱ्यांचे नेते असून त्यांच्यावर सर्व स्तरातील नागरिकांनी प्रेम केले असुन जनतेच्या मनातले आमदार म्हणून ते गेल्या पाच वर्षापासून काम करत आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद असतानाही जमिनीवर असणारा नेता म्हणून नामदार संजय बनसोडे यांची ओळख आहे ते काल निघालेल्या रॅलीतून नागरिकांनी दाखवून दिले आहे. ना.संजय बनसोडे यांच्या प्रचारासाठी उदगीर शहरातील आडत मार्केट यार्डातुन पदयात्रा व रॅलीची सुरूवात ढोलताशांच्या गजरात सुरुवात केली. यावेळी ना.संजय बनसोडे यांनी व्यापा-यांच्या भेटी घेवुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी व्यापा-यांनी ना.बनसोडे यांचे जंगी स्वागत केले. यावेळी पदयात्रा आडत मार्केट ते गणेश मंदिर जय जवान चौक ते मधुबन हॉटेल ते हनुमान कट्टा ते आर्य समाज ते चौबारा ते पोलीस स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा, शिवसेना, रिपाई व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
