*आमदार व मंत्री पद हे जनतेची कामे करण्यासाठी असतात ते मिरवायची नसतात : क्रीडामंत्री संजय बनसोडे* 👉*मागील पाच वर्ष आपला जनसेवक म्हणून काम केले* 👉*लिंबोटीचे पाणी आणून उदगीरकरांची तहान भागविली* उदगीर : मागील माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्व जाती धर्माच्या मंडळींना सोबत घेऊन उदगीरचा विकास केला, श्री गुरु हावगीस्वामी मठ, लिंगायत भवन, लिंगायत चौकी मठ, सिद्धरामेश्वर मठ , स्मशान भुमी, अशा अनेक ठिकाणी निधी दिला,श्री रेणुकाचार्य भवन, मराठा भवन अशा विविध भवनाची निर्मिती करून शहराचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. मंत्री पदाची हवा कधी डोक्यात जाऊ दिली नाही आमदार व मंत्री पद हे जनतेची कामे करण्यासाठी असतात ते मिरवायची नसतात मी मागील पाच वर्ष मी जनतेचा जनसेवक म्हणून काम केले आहे पुढील पाच वर्षे ही तसेच काम करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले. उदगीर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ तळवेस व गोपाळ नगर परिसरात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे बोलत होते. पुढे बोलताना ना. बनसोडे म्हणाले की, मी एक नशीबवान लोकप्रतिनिधी आहे. कारण येथील जनतेने माझ्यावर अफाट प्रेम केले आहे. गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रेमाच्या जोरदार उदगीरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. साडेसहा हजार कोटी रुपयांचा विकास निधी आणून या मतदारसंघाला विकासाच्या एका नव्या टप्प्यावर आणले आहे. या केलेल्या कामाच्या जोरावर मला मते मागण्याचा अधिकार असल्यानेच मी आज मते मागण्यासाठी उभा आहे असे सांगून ना. बनसोडे यांनी अनेक वर्षापासून रखडलेली लिंबोटीची पाणी पुरवठा योजना पूर्ण केली त्यामुळे आज उदगीरकराना मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे ते म्हणाले. शाहरतील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे याकरिता भूमिगत गटारे करण्यात येणार आहेत. उदगीर शहराला पाणी टंचाईच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी लिंबोटी धरणातून पाणी आणून या शहरातील जनतेची तहान भागविण्याचे काम मी पाणीपुरवठा खात्याचा राज्यमंत्री असताना केले असल्याचे ना.बनसोडे यांनी संगीतले यावेळी शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

