अतिक्रमण हटाव पथक गायब, उदगीरात वाहतुकीची कोंडी 👉 अर्धे व्यापारी,हातगाडे, रस्त्यावर 👉 रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा, भाडे वसुली दुकान मालका कडून,अन्य वसुली नप कडून ? 👉 नप अतिक्रमण हटाव पथक वसुली साठी ? उदगीर:- उदगीर नगर पालिकेत सद्या अंधेर नगरी चालु असल्याचे बोलले जात असताना शहराच्या मुख्य रस्त्यावर ठेले, छोठे व्यापारी यानी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली असताना नप चे अतिक्रमण हटाव पथक हे फक्त नावालाच उरले असल्याने शहरात मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होऊन एक एक तास वाहतूक विस्कळित होत असल्याने सामान्य नागरिक दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे त्रस्त असून ट्रॅफिक पोलिस काही प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करून ही त्यांना नप चे सहकार्य मिळत नसल्याने त्याची ही कोंडी होताना दिसत असून,दररोज मुख्य रस्त्यावर एक एक तास वाहतूक कोंडी होत असताना बस स्टँड,उद्योग भवन समोर,शिवाजी महाराज चौक, जय जवान चौक, जाकीर हुसैन चौकातून सामान्य नागरिक कसरत करत चालावे लागत असताना यास जबाबदार कोण हे लोकांना समजत नाही,वरिष्ठ विभागाने या वाहतूक कोंडी ची दखल घेऊन त्वरीत उपाय करावे अशी मागणी उदगीर कर करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

