उदगीरात पत्रकारांची आरोग्य तपासणी उदगीर : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई ही पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर घेऊन साजरा करण्यात आला. मराठी पञकार परिषद ,मुंबई शाखा उदगीर ,इंडीयन मेडीकल असोशिएशन यांचे संयुक्त विद्यमाने मातभुमी महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले . यावेळी पञकार व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उपविभागीय आधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले. तसिलदार राम बोरगावकर अध्यक्ष इंडीयन मेडीकल असोशियएन अध्यक्ष डाॅ. बाळासाहेब पाटील ,सचिव डाॅ.महेश जाधव ,कोषाध्यक्ष डाॅ. संगमेश्वर दाचावार ,डाॅ. अनुप चिकमुर्गे ,डाॅ.संगमेश्वर सिद्धेश्वरे ,स्वाती पाटील , डाॅ. ज्योती सोमवंशी डाॅ.प्रशांत नवटक्के , सतिश उस्तुरे ,पञकार व्हि.एम.कुलकर्णी ,युवराज धोतरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी पञकार परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे यांनी केले. सुञसंचलन विक्रम हलकीकर आभार प्रा. बिभीषन मद्देवाड यांनी केले. सिद्धार्थ सुर्यवंशी , रविंद्र हसरगुंडे ,सुनिल हवा ,रामबिलास नावंदर , ,महादेव घोणे ,संदिप निडवदे ,अॅड श्रावण माने ,श्रीपाद सिमंतकर ,महेश मठपती ,विश्वनाथ गायकवाड , निलेश हिप्पळगावकर,निवृती जवळे ,बालाजी टाळीकोटे ,आशोक तोंडारे ,बाबासाहेब मादळे आदी पञकार उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
