उदगीर डेअरी पुनर्निर्माण साठी सरसावले खासदार डॉ काळगे उदगीर :- नवी दिल्ली येथे भारत सरकारचे पंचायत राज मंत्री व मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. राजीव रंजन सिंह यांची भेट लातूर चे खासदार डॉ शिवाजी का यानी भेट घेतली. या भेटीदरम्यान लोकसभेत शून्य काळ दरम्यान उपस्थित केलेल्या उदगीर डेअरी प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याबाबत च्या मुद्यावर चर्चा करून पाठपुरावा केला. प्रकल्पाच्या अडचणी, विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि त्याची महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी मंत्री महोदयांना सविस्तर माहिती दिली. मंत्री महोदयांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत डेअरी सचिव यांच्याशी तात्काळ चर्चा केली आणि प्रकल्पाशी संबंधित माहिती महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांकडे सादर करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. उदगीर डेअरी प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी उचललेले हे खासदाराचे पाऊल निश्चितच शेतकरी वर्ग आणि दुग्धव्यवसायाला दिलासा देणारे ठरेल.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
