वाढवना पोलिस स्टेशन हद्दीत मटका जेऊ देईना,दारू झोपू देईना! उदगीर:- वाढवना पोलिस स्टेशन हद्दीत सद्या अवैध धंद्याला उत आला असून , गावा गावात मटका जोमात चालु असून ही येथील पोलिस अधिकाऱ्यांना हे कसे दिसत नाही हा प्रश्न सामान्य जनतेस पडला असून मटका दारू मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना , छोटी सी कार्यवाही करून मोठा गाजावाजा करत आपले खिसे गरम करत असल्याचे ही लोक बोलत आहेत, तर वाढवणा पोलिस स्टेशन चे अधिकारी मी नाही त्यातली हे दाखऊन मी किती प्रामाणिक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
