जागृती ने लावली शेतकऱ्याची वाट 👉10 वर्ष फुकट शेअर चे पैसे वापरले, बँकेने व्याज वसूल केले,कारखाना फुकट करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जबरन मुद्दल देणे सुरू उदगीर:- जागृती साखर कारखान्याचे सभासद कारणासाठी शेतकऱ्याच्या नावावर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्याच्या नावावर कर्ज टाकून 25 हजार रु घेतले, बैंकेने शेतकऱ्याकडून प्रत्येक वर्षी व्याज वसूल केले,शेतकऱ्याच्या पैश्यावर कारखाना फुकट करून घेतला खरा पण शेतकऱ्याचे कैवारी म्हणविणाऱ्या शेतकऱ्यास दिवसा नागवले असल्याचे चित्र असून,शेतकऱ्याकडून कुठलीच शेअर परत देण्याचा तगादा नसताना कारखाना शेअर चे पैसे जबरन शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करत असल्याने शेतकरी सभासद संताप व्यक्त करत असून,आता असे लुटलेले शेतकरी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे समजते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
