४ जानेवारी रोजी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांचा नागरी सत्कार *👉नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन* *उदगीर* : उदगीर-जळकोट विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या व सर्व समस्त नागरीकांच्या वतीने राज्याच्या सहकारमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मा.ना.श्री. बाबासाहेबजी पाटील, व उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मंत्री, आमदार संजयजी बनसोडे, माजी मंत्री, आ. संभाजी पाटील निलंगेकर, मा.आ.श्री. रमेशअप्पा कराड, मा.आ.श्री. अभिमन्यू पवार, माजी आ. श्री. गोविंदराव केंद्रे, अध्यक्ष (स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळ म. राज्य) या सर्व मान्यवरांचा सदगुरु श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर सह. अध्यक्ष, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर यांच्या शुभहस्ते शनिवार दि.०४ जाने. २०२५ रोजी उदगीर शहरातील विद्यावर्धिनी हायस्कुल येथे सायं. ०५.०० वाजता जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे. तरी या सत्कार सोहळयास आपण उदगीर व जळकोट तालुक्यातील नागरीकांनी उपस्थित राहुन मान्यवरांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन नागरी सत्कार सोहळा समिती उदगीरच्या वतीने करण्यात आले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

