नवीन जिल्हा निर्मिती सध्या नाही= महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उदगीर=चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही. पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना १०० दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत.', अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. त्या मुळे उदगीर जिल्हा होईल हे दिवा स्वप्नच राहणार आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी