पत्रकार अशोक तोंडारे चा झटका,मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महा इ सेवा केंद्र चालक राहुलळे विरुद्ध एन सी दाखल 👉 आधार अपडेट साठी जास्त पैसे घेणे भोवले 👉 अधिकाऱ्यांनी भरपूर वाचवण्याचा केला प्रयत्न पण संपादक अशोक तोंडारे यांनी हार न मानता लढत शेवटी एन सी दाखल करण्यास पडले भाग उदगीर:- येथील नप संकुल येथील महा इ सेवा केंद्र चालक राहुल रक्षाळे यांच्या महा इ सेवा केंद्रावर संपादक तथा पत्रकार अशोक तोंडारे आपल्या बहिणीचे आधार अपडेट करण्यास गेले असता त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले एवढेच नाही तर नंतर प्रिंट घेण्यास गेले असता परत पैशाची मागणी केली असता त्यांनी विरोध करताच त्यांना धमकावत मी सगळ्या अधिकाऱ्यांना पैसे देतो माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असता उदगीर तसीलदार तथा वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करून ही अधिकारी या महा इ सेवा केंद्र चालकाविरुध कुठलीच कार्यवाही करत नसल्यानी तोंडारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कडे संघटने मार्फत तक्रार करताच ,मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेश येताच उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे संपादक अशोक तोंडारे यांच्या तक्रारी वरुण महा इ सेवा केंद्र चालक राहुल रक्षाळे विरुद्ध कलम भारतीय न्याय संहिता 2023= ने कलम 352,351(2),351(3)एन सी दाखल दाखल केली असून या बद्दल संपादक अशोक तोंडारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे कारण की असे महा इ सेवा केंद्र चालक सामान्य जनतेची अधिकाऱ्यांना धरून जी लूट करत आहेत यास चाप बसणार आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
