*उदगीरच्या पत्रकारांचा आदर्श इतरांनी घ्यावा : माजी मंत्री आ.संजय बनसोडे* 👉 तब्बल 4 कोटी चे पत्रकारभवन उदगीर चे नावलौकिक करणार 👉गेल्या ४० वर्षापासूनची पत्रकारांची मागणी पूर्ण केल्याचे समाधान 👉 पत्रकार भवन साठी 4 कोटी निधी देऊन आज भूमिपूजन करत असल्याबद्दल आमदार संजय बनसोडे यांचे उदगीर श्रीनिवास सोनी,विनायक चाकुरे, सुनील हवा,रोशन मुल्ला ,अर्जुन जाधव,युवराज धोत्रे यांनी सत्कार करत मानले आभार *उदगीर* : उदगीर शहरातील पत्रकार हे जागरूक पत्रकार असून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे काम ते करत असतात. उदगीरच्या विकासात येथील पत्रकारांचेही मोलाचे योगदान असून वास्तववादी लिखाण करणारे आपले पत्रकार बांधव हे आपल्या समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतात. वेळ प्रसंगी कडक भूमिका घेऊन समाजातील चांगल्या वाईट घटना प्रशासनासमोर मांडून ते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतात. एखाद्या प्रश्नासंबंधी जिद्द व चिकाटीने काम करण्याची हातोटी येथील पत्रकारांमध्ये असल्यानेच आज गेल्या ४० वर्षापासूनची असलेली पत्रकार भवनाची मागणी पूर्ण होत आहे म्हणून उदगीरच्या पत्रकारांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे मत माजी क्रीडामंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील पत्रकार भवनाच्या भूमीपुजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, नायब तहसीलदार राजश्री भोसले, उपविभागीय अभियंता एल.डी. देवकर, श्याम डावळे, युवराज धोतरे, भरत चामले, अॅड.अजिंक्य रेड्डी, अनिरूद्ध गुरुडे, इम्तियाज शेख, आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार भवन कृती समिती पदाधिकारी श्रीनिवास सोनी, विनायक चाकुरे, सुनील हवा,रोशन मुल्ला यांनी शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून आ.संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मागील ४ दशकापासुन पत्रकार बांधवांना हक्काची जागा उपलब्ध नव्हती म्हणून पत्रकार बांधवांची गैरसोय होत होती. मागील काळात त्यांनी माझ्याकडे मागणी करुन त्याचा सतत पाठपुरावा केला त्यामुळे त्यांना मी मंत्री असताना ४ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देवून महाराष्ट्रात एक नंबरचे पत्रकार भवन आपल्या उदगीरला उभारले जाईल अशी ग्वाही आ.बनसोडे यांनी दिली. उदगीरच्या विकासात येथील पत्रकारांचेही योगदान असुन पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याचे सांगितले. या चार मजली पत्रकार भवनमध्ये एक काॅन्फरन्स हाॅल, गेस्ट हाऊस, आदींचा समावेश असुन पत्रकार बांधवांच्या हक्काची ती जागा असेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन शिवशेट्टे यांनी केले. मनोगत विनायक चाकुरे, सुनिल हावा, प्रभुदास गायकवाड, यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी केले तर आभार अशोक कांबळे यांनी मानले. यावेळी उदगीर येथील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

