पालखी सोहळ्यात लोटला जनसागर उदगीर= श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या 62 व्या ब्रमोत्सवा निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात दर्शन घेण्यासाठी भक्ताचा जनसागर उसळला येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण मंदिर च्या 62 व्या ब्रमित्सवा निमित्त आज पाचव्या दिवशी श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथून भव्य पालखी निघाली,सदरील पालखी मंदिर,हनुमान कट्टा, आर्य समाज, चोबारा,कॉर्नर ते मुख्य बाजारपेठेतून परत लक्ष्मीनारायण मंदिर येथे पोहचली,पालखी चे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गर्दी केली होती,भक्त फुलाची उधळण करत जागो जागी आरती पुष्प माला अर्पण करत होते,पालखी मंदिरात पोहोचताच फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली तदनंतर आरती होऊन श्रीरंग कृष्ण कुमार मालू परिवारातर्फे महप्रसादीं देण्यात आली, मागील 5 दिवसा पासून सुरू असलेल्या ब्रामोत्सवाची उद्या एकादशी दिवाशी चक्री स्नानाने सांगता होणार आहे 👉 उदगीर तालुका माहेश्वरी सभे ने केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे निषेध उदगीर शहरात श्री लक्ष्मीनारायण मंदिर ब्रमोत्सवा निमित्त निघत असलेल्या पालखी सोहळ्यात सर्वांनी शामिल व्हावे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापने पासून या दिवशी बाजार बंद ठेवला जातो पण येथील काही जास्त शहाणे,हिंदू विरोधी ने आज बाजारात सुट्टी घोषित न केल्याने उदगीर तालुका माहेश्वरी सभे ने कृषी उत्पन्न बाजार समितीचे जाहीर निषेध केले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
