उदगीर तालुक्यात दिवसा झाडाच्या कत्तली! वन विभाग डोळे झापून गप्प 👉 कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत आरा मशीन उदगीर:- उदगीर तालुक्यात झाडे तोडण्यास बंदी असताना ही दिवसा झाडे तोडणे चालू असून दररोज 25,30 गाड्या लाकूड शहर व परिसरातील आरा मशीन वर येत असताना वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी डोळे झाकून गप्प असल्याने आरा मशीन वाल्यांना चांगले दिवस आल्याचे दिसत आहे,एकीकडे एखाद्या झाड तोडण्याची कधीतरी परवानगी घ्यायची आणि तेच झाड तोड परवाना कोणी विचारले तर दाखवायचे असे चालू असून यात अधिकारी व कर्मचारी मालामाल होत असल्याची चर्चा ही शहरात सुरू असून वन मंत्र्यांनी त्वरित दखल घेऊन येथील आरा मशीन वर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी वृक्ष प्रेमी करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
