उदगीरातील 3 सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार 👉एकूण पाच सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार). पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची कारवाई. उदगीर = याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे विवेकानंद चौक, व उदगीर शहरातील तसेच लातूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी तयार करून वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांविरुद्ध एक वर्षा करिता हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारची कारवाई करण्यात आलेल्याचे नावे 1) अक्षय उर्फ आकाश राम तेलंगे, वय 21 वर्ष, राहणार गोपाळ नगर लातूर 2) साहिल महबूब सय्यद, राहणार संजय नगर लातूर. 3) बालाजी रामराव डोंगरे, वय 58 वर्ष, राहणार इंदिरानगर उदगीर. 4) किशोर कोंडीबा धनवाले, वय 40 वर्ष, राहणार गणेश नगर उदगीर. 5) कृष्णा प्रल्हाद गाडेकर, वय 30 वर्ष, राहणार सोमनाथपूर उदगीर. असे असून नमूद आरोपींतावर पोलीस ठाणे विवेकानंद चौक, उदगीर शहर व लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये समाजविघातक कारवाया करणे, परिसरातील रहिवासी लोकांच्या मालमत्तेला इजा पोहोचून भय निर्माण करणे, प्राणघातक शस्त्र वापरून दहशत निर्माण करणे, आजन्म कारावास किंवा अन्य करावासाचे शिक्षेस पात्र असलेले गुन्हे करणे, शांतता भंग करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती. लातूर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी. नमूद सराईत गुन्हेगारांकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये, याकरिता लातूर शहरात वारंवार मालमत्ता विषयी व शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून सामाजिक शांतता करणाऱ्या गुन्हेगाराना 01 वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले असून नमूद गुन्हेगारांना लातूर जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर सोडण्यात येत आहे. नमूद आरोपी विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी, (लातूर शहर) रणजीत सावंत, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी (उदगीर) सोहेल शेख, पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस ठाणे उदगीर शहर चे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस अमलदार प्रदीप स्वामी, पोलीस ठाणे विवेकानंद चौक व उदगीर शहर चे पोलीस अंमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर, गणेश यादव, रणवीर देशमुख, यशपाल कांबळे, बबन टारपे , गजानन पुल्लेवाड, दीपक कच्छवे, संदीप साठे, रवी शेळके यांनी सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे पाठविले होते. त्यावर पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्तावांचे अवलोकन करून नमूद आरोपीमुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून सदर सराईत गुन्हेगारांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात केले आहे. गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसवण्यासाठी या आधी अनेक गुन्हेगाराना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच आणखीन सराईत गुन्हेगारांचे तडीपाराचे प्रस्तावावर कार्यवाही सुरू असून पुढील काही दिवसातच आणखीन सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी