उदगीर नप अभियंता सुनील कटके गायब,पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार,शहरात चर्चेला उधाण उदगीर:- उदगीर नप चे अभियंता सुनील कटके हे घरातून निघून गेल्याची तक्रार त्यांची पत्नी संगीता सुनील कटके यानी उदगीर शहर पोलिस स्टेशन ला दिल्याने शहरात चर्चे ला उधाण आल्याचे दिसून येत आहे सुनील शंकर कटके वय 52 वर्ष रा.हावगीस्वामी काॅलेज जवळ नगर पालिकेचे क्वार्टर उदगीर मो नं 8308361234 हे काही एक न सांगता घरातुन निघुन गेले आहेत. अभियंता सुनील शंकर कटके यांची उंची 5 फुट 4इंच, रंग सावळा, नाक सरळ, चेहरा लांबट, कपाळ मोठे,केस काळे पांढरे,अंगात पांढरा चौकडा निळया पटटया असलेला शर्ट,व चाॅकलेटी रंगाची पॅन्ट ,पायात चाॅकलेटी रंगाची चप्पल अशा वर्णनाचे निघुन गेले आहेत वगैरे जबाब आज रोजी पोलीस स्टेशन येथे येवून त्यांची पत्नी संगीता कटके यांनी दिले वरून मा पो नि सो यांचे आदेशाने मिसिंग 02/2025प्रमाणे दाखल करून पुढील तपास कामी पोहेका/ 1398 हारणे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे , नप अभियंता मार्च एंड ला घरातून निघून गेल्याने शहरात चर्चे ला उधाण आल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी