महाराष्ट्र प्रदेश मारवाड़ी युवा मंच प्रदेश अध्यक्ष पदी सौ.अमृताची भुतडा उदगीर:- अखिल भारतीय मारवाडी युवा मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नाशिक येथील सौ.अमृताची भुतडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली,आज शेगाव येथे झालेल्या महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंच दशम प्रांतीय अधिवेशनात नूतन अध्यक्ष सौ.अमृताची भुतडा यांच्या सह प्रांतीय उपाध्यक्षांना राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशोर वर्मा यांनी शपथ दिली या वेळेस रमेशजी बंग,पूर्व अध्यक्ष कैलाशजी राठी,खासदार अनुप धोत्रे , आमदार चैनसुख संचेती,पूर्व आमदार गोपीकिशन बजोरिया,आमदार अग्रवाल,आमदार वसंत खंडेलवाल, निकेशजी गुप्ता,सुनीलजी खाबिया, उमेशजी पंचारिया,उमेशजी बंग, सिद्धार्थ रूहाटिया, रोहित रुंगटा, गोविंदा सोनी सह अनेक पदाधिकारी सह उदगीर मारवाडी युवा मंच चे अध्यक्ष पवन मुंदडा,मार्गदर्शक श्रीनिवास सोनी,रामविलास नावंदर सह अनेक शाखेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
