पत्रकार दत्ता पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हनुमंत घोणसे वर गुन्हा दाखल उदगीर: देवणी येथील दै. देशोन्नती चे तालुका प्रतिनिधि दत्ता पाटील रा.तळेगाव ता.देवणी यांना दारूची बातमी छापल्याचा कारणा वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात होती या प्रकरणी पत्रकार सौरक्षण कायद्यानुसार देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतीत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गेल्या आठवड्यात देवणी तालुक्यातील अवैध देशी दारू जप्त केल्याची बातमी दैं. देशन्नती या दैनिकात प्रकाशित झाली होती. याचा राग मनात धरून माझ्या मुलाची बदनामी करतो का म्हणुन आर्वाच भाषेत शिवागाळ करत परिवारास जिवे मारण्याची धमकी हनुमंत रंगराव घोणसे यांनी पत्रकार दत्ता पाटील यांना दिली होती,या प्रकरणी देवणी पोलिसात पत्रकार दत्ता पाटील यांनी तक्रार दाखल करताच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार हनुमंत रंगराव घोणसे रा. तळेगाव ता. देवणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबतचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक याच्या कडून करण्यात येत आहे.या धमकीचा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने सर्वात पहले निषेध नोंदवला होता.
• श्रीनिवास मदनलाल सोनी