लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार श्रीनिवास सोनी यांना जाहीर 👉 मारवाडी समाजासाठी सतत झटणाऱ्या व्यक्तीस हा विशेष पुरस्कार जिल्हा सभे तर्फे देण्यात येते 👉 5 जून 20250 गुरुवारी दयानंद सभागृह लातूर येथे सदरील पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार उदगीर= उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष तथा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना मानाचा समजला जाणारा लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चा महेश गौरव पुरस्कार घोषित झाला असून 5 जून 2025 रोजी हा पुरस्कार लातूर येथे मोठ्या थाटात दिला जाणार असल्याचे जिल्हा सभे चे सचिव फुलचंद काबरा यांनी सांगितले आहे लातूर जिल्हा माहेश्वरी सभे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित महेश गौरव पुरस्कार या वर्षी उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास मदनलाल सोनी यांना घोषित झाला असून हा पुरस्कार मारवाडी समाजासाठी विशेष काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो,श्रीनिवास सोनी यांनी येथील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमी साठी शासनाकडून 10 गुंठे जागा सह स्मशानभूमी विकासासाठी 30 लाख रुपयाचा निधी ही आमदार संजय बनसोडे यांच्या कडून उपलब्ध करून घेतले तसेच मारवाडी समाजातील गरीब कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देणे,समाजासाठी विविध योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणे,अशा अनेक समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना घोषित करण्यात आल्याचे लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे सचिव फुलचंद काबरा यांनी सांगितले आहे,हा पुरस्कार श्रीनिवास सोनी यांना घोषित झाल्या बद्दल लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे अध्यक्ष प्रकाश कासट, सचिव फुलचंद काबरा,उदगीर येथील प्रसिद्ध समाजसेवक महेश भूषण डॉ रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, गोविंदलाल राठी,कैलास बियाणी अशोक बाहेती , जगदीश बागडी, रामविलास नावंदर,विनोदकुमार टवानी, डॉ रामेश्वर बाहेती,उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे सचिव राजगोपाल मणियार,आनंद बजाज, डॉ प्रवीण मुंदडा,राधेश्याम इनानी,द्वारकादास भुतडा,शिरीष नावंदर,राजेश सारडा ,सत्यनारायण सोमाणी, गणेश बजाज,मारवाडी युवा मंच अध्यक्ष गोविंद मुंदडा,लक्ष्मीकांत सोमाणी,पवन मुंदडा सह उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे सचिव सुनील हवा सह सर्व समाज प्रेमी यांनी सोनी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या
• श्रीनिवास मदनलाल सोनी
