उदगीर शहर परिसरात मटक्याच्या सुळसुळाट,अनेक परिवार उध्वस्त? 👉 जिल्ह्यात अवैध धंद्याचा नायनाट म्हणणारा पोलिस विभाग मूग गिळून गप्प ? उदगीर:- उदगीर शहर व परिसरात सध्या अवैध धंद्याचे बस्तान असून ही पोलिस विभाग मूग गिळून गप्प असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र असून मटक्याने तर कहरच केले असून गल्ली बोळात राजरोस मटका चालू असल्याचे चित्र दिसत आहे उदगीर शहर एक ऐतिहासिक ,शैक्षणिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे पण मागील काही दिवसापासून शहर व परिसरात अवैध धंद्याचे बस्तान बसले असून शिवाजी चौक,बस स्टँड समोर खुलेआम मटका घेतला जात असताना अवैध धंदे जिल्ह्यात चालणार नाही अशी वल्गना करणारे आता गप्प का झाले ,कोणत्या मटकेवाल्यान यांना मॅनेज केले ही चर्चा शहरात जोरात चालू आहे,एकीकडे शहरातील कुठल्याच अधिकाऱ्यावर कोणाचेही अंकुश नसल्याचे चित्र दिसत असून शहरात रेती माफिये,मटका माफियांचे राज्य सुरू झाले का हा प्रश्न सामान्यांना पडत असून सध्या शहरातील अनेक कार्यालयात दलालांचे राज्य असल्याचीही चर्चा असून या अशा बाबींमुळे उदगीर शहराचे नाव बदनाम होत असून या अवैध धंद्यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी सामान्य जनता करत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
