साहेबांचा वचक संपला का अधिकाऱ्यांनी ओळखली पोती? 👉 उदगीर तालुक्यातील अधिकारी निर्ढावले,यांच्यावर वचक कोणाचा उदगीर:- तालुक्यातील अनेक कार्यालयात सध्या अंधेरनगरी चालू असून ही या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कोणीच आवाज उठवत नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत असून अनेक जण तर साहेबाचा वचक संपला तर काही जण अधिकाऱ्यांनी साहेबाची पोती ओळखल्याचे बोलताना दिसत आहेत उदगीर तालुक्यातील अनेक कार्यालयात सध्या अंधेर नगरी चौपट राज दिसत असून येथील अधिकारी हे स्वतःस हुकूमशाह सारखे वागताना दिसत आहेत,महसूल विभागाकडे कुठलीही तक्रार करा त्या तक्रारीस कचऱ्याच डब्बा दाखवला जात आहे कारण की या तक्रारीत या विभागाचा कोणी अधिकारी ,कर्मचारी अडकत असल्याने वरिष्ठ त्यास वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे दिसून येते,दुसरीकडे नगरपालिकेत सध्या प्रशासक राज्य चालू असून दोन दोन महिने टेंडर फ्लॅश होऊन ही टेंडर सुटत नाही,पुढे पावसाळा असल्याने कामे होतील कसे हे प्रशासक आणि तेथील अधिकाऱ्यांनाच माहित,शहरात अनेक ठिकाणी भूमिगत ड्रेनेज चे काम चालू असून हे काम किती उत्कृष्ट होत आहे हे जाणून घेण्यासाठी उदगीरकर उत्सुक असून ही त्याची माहिती मिळत नसल्याचे दिसते,शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढत असताना नगरपालिकेचा अतिक्रमण हटाव पथक गायब असल्याचे चित्र दिसत आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भिंतीला तडे गेल्याने त्यांचे काम किती उत्कृष्ट झाले याचे प्रमाणपत्र देणे शिल्लक राहिलेले दिसते,तालुक्यातील नवीन निर्मित रस्त्याची वाट लागल्याचे दिसते,शहरात भर चौकात मटका,गल्लीत दारू शहरात अवैध धंद्यांना ऊत आले असतांनाही पोलिस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे, उदगीर ला आर टी ओ कार्यालय व्हावे अशी उदगीर कराची इच्छा होती ती पूर्ण झाली खरी पण येथील अधिकारी सकाळ संध्याकाळ रिंग रोड,मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडून अवैध वसुली करत असल्याने उदगीर शहरातील व्यापारावर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत, हे सर्व होत असताना साहेब गप्प का बसले आहेत हे जनतेला कळत नाही ,साहेबाची अधिकाऱ्यावरची वचक संपली ? अधिकाऱ्यांनी साहेबाची पोती ओळखली अशी चर्चा नगरपालिकेसमोर जनता करताना दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
