शाळा, कॉलेज मधून टि. सी.काढण्यासाठी कुठलीही फी देऊ नका = शिक्षण अधिकारी 👉 फी घेतल्यास कठोर कार्यवाही करणार उदगीर= 16जून 2025पासून शाळा सुरू होणार असुन काही पालक आपल्या पाल्यांना इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणार आहेत तर काही पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश पुढील वर्गात घेणार आहेत. ग्रामीण भागात बऱ्याच खेड्यात गावात फक्त इयत्ता चौथी वर्गापर्यंत चे वर्ग असलेली शाळा असते तर काही ठिकाणी फक्त इयत्ता सातवी वर्गापर्यंत, चे वर्ग असलेली शाळा असते. तर काही ठिकाणी फक्त दहावी वर्गापर्यंत चे वर्ग असलेली शाळा असते. या वेळी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, टी. सी. म्हणजेच शाळा सोडण्याचे प्रमाण पत्राची गरज असते. अशा वेळी आपली टी. सी. काढण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस शाळेला, कॉलेज ला, घेण्याचा अधिकार नाही. हा नियम जिल्हा परिषद शाळेसाठी, खाजगी अनुदानित शाळेसाठी,विनाअनुदानित, शाळा मराठी माध्यमासाठी, लागू आहे. असे असताना जर शाळेने, टी. सी. साठी पालकांकडे,विद्यार्थ्याकडे, फिसची मागणी केली असता तक्रार आल्यास त्या शाळेवर, जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे उदगीर येथील गट शिक्षण अधिकारी शेख यांनी सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी