इनोव्हा गाडी रस्ता दुभाजकावर आदळून एक ठार तीन जखमी उदगीर - उदगीर-नळेगाव रोडवर भरधाव इनोव्हा गाडीने रस्त्याच्या मधील दुभाजकाला जोराची धडक दिल्याने पलटी होऊन भीषण अपघात झाला. यात एकजण जागेवरच ठार झाला असुन तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उदगीरहुन वलांडीकडे जात असताना उदगीर-नळेगाव रोडवर सीएनजी पेट्रोल पंपासमोर इनोव्हा क्रमांक एमएच 24 एएस 2555 ही गाडी दुभाजकाला धडकुन बाजूच्या कार क्रमांक एमएच 12जेडी 1546 ला धडकली. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात इनोव्हा गाडी चक्काचूर झाली आहे. इनोव्हा गाडीतील चार प्रवाशापैकी सचिन काशीनाथ मांडगुळे (वय-30) जागीच ठार झाला आहे. तर अशिलेश बालाजी सोनकवडे (वय-23), अश्विनकुमार बालाजी सोनकवडे, (वय-24) संकेत प्रभाकर सोनकवडे (वय-19) सर्व राहणार वलांडी, ता. देवणी जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
