इंजिनियर नाही यांच्या पेक्षा गुराखी बरे ? 👉 मारवाडी स्मशानभूमी ची लावली वाट? 👉 लोणारे साहेब मुख्याधिकारी साहेबासमोर एक आणि बाहेर आले की एक बोलतात 👉 40 फूट खोल खणतीत लोक अंतिमसंस्काराठी जातील कसे? उदगीर:- येथील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमी साठी अथक प्रयत्नांती फुले नगर येथील 40 फूट खोल खंतीची 10 गुंठे जागा मारवाडी समाज स्मशानभूमी साठी शासनाकडून देण्यात आली तर या स्मशानभूमी विकासासाठी पूर्व कॅबिनेट मंत्री तथा उदगीर चे आमदार संजय बनसोडे यांनी 50 लाखा चा निधी घोषित केला पण तो निधी 30 लाखावर आला,त्याचा जीआर निघाला ,टेंडर झाले पण उदगीर नगरपालिकेच्या अती शहाण्या अभियंत्यांनी स्मशानभूमी विकासाचा असा प्लान बनवला की डोक्याला हात मारून घेण्या पलीकडे काहीच उपयोग नाही असे दिसते कारण की 40फूट खंती मध्ये जाळण्याचे शेड करणार तर 40फूट खोलीत 2.25 मीटर म्हणजे अंदाजे 7, या 7.25 फूट कंपाऊंड करणार असा इष्टीमेट बनवला असून ज्या खणतीत 20 फूट पाणी थांबते तेथे पावसाळ्यात अंत्यसंस्कार कसे होतील ,40फूट खनतीत अंत्यसंस्काराला येणार लोक उतरतील कसे हे अती भारी इंजिनियर यांनाच माहीत, अशा लोकांमुळे उदगीर नगरपालिकेची वाट लागल्याशिवाय राहणार नाही असे दिसते,यांना थोड ही ज्ञान असते तर हे अशा प्रकारचे प्लान केले असते का हा ही प्रश्न उपस्थित होत असून,तीन महिने झाले टेंडर सुटून यांनी शेवटी मागे लागून मागे लागून झाल्यावर प्लान दिला असून , नकटीच्या लग्नात सतरासे विघ्न म्हणण्याची पाळी मारवाडी समाजावर आली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
