पत्रकार भवन कृती समिती निमंत्रक पदी अर्जुन जाधव 👉 कृती समितीच्या 59 पैकी 37 सदस्यांनी केली बिनविरोध निवड उदगीर= येथील पत्रकार भवन दर्जेदार व्हावे या साठी पत्रकारांनी कृती समिती स्थापन केली होती , त्या पत्रकार भवन चे काम निकृष्ट होत असल्याने पत्रकारांनी वेळोवेळी अनेक निवेदन दिली पण निकृष्ट काम करणाऱ्यास प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालत असल्याने आज कृती समितीच्या 59 पत्रकारांपैकी 37 पत्रकारांनी या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृती समिती निमंत्रक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे उदगीर तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती प्रमुख अर्जुन दत्तात्रय जाधव यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकारांनी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर बोंब मारो आंदोलन करून उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे यांना निवेदन दिले असून उपजिल्हाधिकारी यांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर त्वरित कार्यवाही करून पुढील काम त्वरित चालू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या
• श्रीनिवास मदनलाल सोनी
