उदगीरात पत्रकार करणार बोंब मारो आंदोलन 👉दोन महिने होऊन ही पत्रकाराच्या निवेदनावर कार्यवाही नाही 👉 पत्रकार भवनाचे काम निकृष्ट करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करून त्यास काळ्या यादीत टाका,नवीन ठेकेदार नेमून त्वरित काम चालू करा 👉 पत्रकार भवन कृती समितीच्या 59 पैकी 40 पत्रकारांनी सह्या करून दिले निवेदन उदगीर= येथील पत्रकार भवन चे काम ठेकेदार निकृष्ट करत असल्याची तक्रार पत्रकारांनी 17/4/2025 रोजी दिल्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास काम त्वरित बंद करावे असे सांगितले असताना ठेकेदाराने मधेच एक्या दिवसी गुपचुप काम चालू केल्याने परत पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अधिकारी यांना कळवताच त्यांनी पाहणी करून काम न करण्याची सक्त सूचना दिली,पत्रकारांनी तक्रार देऊन दोन महिने होत असताना संबंधित ठेकेदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही किंवा त्यास काळ्या यादीत टाकण्यात ही आले नाही किंवा ठेकेदार ही बदलला नसल्याने पत्रकाराच्या निवेदनास अधिकाऱ्यांनी कचऱ्याचा डब्बा दाखवला का? हा प्रश्न पत्रकारांना पडला असून आता पत्रकार आंदोलनाच्या पवित्र्यात असून 17/6/25 पर्यंत नवीन ठेकेदार नियुक्त करून पत्रकार भवन चे काम सुरू न केल्यास 17/6/2025 रोजी पत्रकार उदगीर येथील कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलनासह धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन सर्व विभागास देण्यात आले असून या निवेदनावर पत्रकार भवन कृती समितीच्या 59 पत्रकारांपैकी 40 पत्रकाराच्या सह्या असून,आता सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन काय कार्यवाही करते हे पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी


