वारीत महिलांचे दागिने चोरी करणारे उदगीरचे चोरटे अटकेत उदगीर=संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दागिने चोरणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून २३ तोळे सोन्याचे दागिणे, १४ मोबाईल असा एकूण २३ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चांदणी शक्ती कांबळे (३२), रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे (३५), बबिता सूरज उपाध्ये (२७), पूजा धीरज कांबळे (३५, सर्व रा. उदगीर, जि. लातूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी