रानमाळच्या जुगार अड्ड्यावर परत पोलिसाची धाड 👉 *तिर्रट जुगार खेळणाऱ्या 37 जणांवर गुन्हा दाखल. 5,19,500/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. 03 पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाची कारवाई* उदगीर= पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी चे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, पोलीस ठाणे उदगीर शहरचे पोनि गाडे, उदगीर ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड, पोउपनि कदम यांच्या नेतृत्वातील संयुक्त पथकाने उदगीर तालुक्यातील देवणी पोलीस ठाणे हद्दीतील मोघा शिवारातील एका बंद जागेवर छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 37 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 5,19,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उदगीर- बिदर रोडवरील मोघा येथे 13/07/2025 रोजी 22.40 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यादरम्यान 37 आरोपी तिर्रट नावाचा जुगार रुपये लावून खेळत व खेळवीत असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे. यामध्ये रोख रक्कम 2,45,000/- रु तसेच मोबाईल किंमत- 2,74,500/- रुपये असे किंमत अंदाजे- 5,19,500/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये आरोपी 1) संजीवकुमारा माधवराव बिरादार वय-45 वर्षे रा. भालकी ता. भालकी जि. बिदर 2) श्रीकांत मनोहर खासेमपुरे वय-32 वर्षे रा.बिदर ता.जि.बिदर 3) पांडुरंग भिमराव धायगुडे, वय-41 वर्षे रा. कासारशिर्सी ता.निलंगा 4) नंदकुमार चंद्रकांत बेल्लाळे, वय-37 वर्ष रा. सुलतानबागवाडी ता. हुमनाबाद जि.बिदर 5) महादेव बाबुराव मसकल्ले, वय-26 वर्षे रा.बिदर ता. जि.बिदर 6) रामेश्वर राजकुमार शेटकार ,वय 29 वर्षे रा. भालको ता. भालकी जि. बिदर 7) मेघराज आशोक पाटील वय-35 वर्षे रा.बेरीबी ता. भालकी जि. बिदर 8) कैलाश रमेश पाटील वय-35 वर्ष रा.भालकी जि. बिदर 9) राजकुमार रामचंद गौड वय-34 वर्षे रा.हल्लाळी ता. भालकी 10) चंद्रकांत जगन्नाथ तळघाटे वय-42 वर्षे रा.संतपुर ता. औराद 11) सल्लाऊदीन अहमदपाशा शेख वय-32 वर्षे रा.संतपुर ता. औराद 12) चंद्रकांत गणपती पाटील वय-32 वर्षे रा.संतपुर ता. औराद जि. बिदर 13) कल्लपा धनराज तळघाटे वय-35 वर्ष रा.संतपुर ता. औराद 14) बंडेप्पा घाळेप्पा कन्नाळे वय-50 वर्षे रा.संतपुर ता.औराद 15) शरणु शिवराज राजापुरे वय-42 वर्ष रा.भालकी ता. भालकी 16) मारोती संगप्पा मळे वय-38 वर्षे रा. वल्लेपुर ता. औराद जि.बिदर 17) अनिल कल्लप्पा दापके वय-45 रा. जुन्नेखेरी ता. औराद जि.बिदर 18) महेश सिद्राम बिरादार वय-32 वर्षे रा. नागराळ ता. भालकी जि.बिदर 19) रविंद्र कल्लप्पा जिर्गे वय-35 वर्षे रा.ऐकलर ता. औराद 20) गणेश मलिकार्जुन अंदुरे वय-34 वर्ष रा.पाटोदा बु. ता.जळकोट 21) शरणप्पा बसप्पा रंजिरे वय-51 वर्ष रा. सुलतानपुर ता. हुमनाबाद जि. बिदर 22) हानमंत विरशेटीअप्पा जानते वय-38 वर्षे रा. सुलतानपुर ता. हुमनाबाद जि.बिदर 23) नरसिम्हा व्यंकया गट्टे वय-67 वर्ष रा. काजीपल्ली विलेज शासकीय शाळेच्या जवळ हैद्राबाद 24) जयपाल व्यंकटराम रेडी वय-42 वर्ष रा. जिलेलगुडा हैद्राबाद, 25) भिम व्यंकटराव बुक्केवाड वय-36 वर्ष रा.सावरगाव ता. देवणी 26) अर्जुन सुभाष बिरादार वय-35 वर्ष रा.सावरगाव ता. देवणी 27) सहदेव श्रीधर बिरादार वय-27 वर्षे रा. सावरगाव ता. देवणी 28) खालेद गफारसाब कुरेशी वय-40 वर्ष रा. उदगीर ता.उदगीर 29) राहुल आशोक कदम वय-35 वर्ष रा. नालंदा नगर उदगीर 30) सत्यनारायण रमेश व्ही. वय 70 वर्ष रा.गटकेसर ता. गटकेसर जि. रंगारेडी, 31) हानमंत अशोक वारे वय 45वर्षे रा मुखेड जि नांदेड, 32) किरण कुमार वय 40 वर्षे रा कत्तापेठ ता जि हैद्रबाद, 33) नयुम मेहबुबसाब शेख, वय 35 वर्षे, रा. बनशेळकीरोड उदगीर, 34) सुरेश चंद्रया एन. वय 48 रा. हैद्राबाद, 35) प्रमोद विदयसागर धुमाळे यांचा समावेश असुन ते या ठिकाणी हजर होते तसेच 36) वजीर महेबुबसाब बंगाली रा. उदगीर हा सदर जुगार क्लब चालवतात. सदर क्लबचे जागेचे मालक 37) शिवाजी अण्णाराव नेमताबादे (पाटील) यांच्याविरुद्ध देवणी पोलीस स्टेशन मध्ये गुरनं 234/2025 कलम 223 व 112 BNS सह कलम 12 (अ) 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंद झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोउपनि व-हाडे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी, उदगीर शहर व उदगीर ग्रामीणच्या पोलिस अधिकारी अमलदारांच्या संयुक्त पथकाने केली आहे.
Popular posts
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
उद्याच्या आंदोलनात उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी सामील होऊन पत्रकारावर अन्याय केलेल्या डॉक्टरांना धडा शिकवा = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= येथील दोन पत्रकारांवर डॉक्टरांनी वीस, वीस कोटी रुपयांची अब्रु नुकसानीची नोटीस बजावली असून त्यांनी हे त्यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी केलेले कृत्य असून अशा नोटीसीला पत्रकार भीक घालणार नसून या डॉक्टरांनी जे अवैध्य दवाखाने स्थापन केले आहेत ते जोपर्यंत जमीनदोस्त होणार नाही तोपर्यंत उदगीर तालुक्यातील पत्रकार शांत बसणार नसून शहरात दररोज नवनवीन आंदोलन करत नगर पालिकेत मुख्याधिकारी दालनात बोंब मारो सह धरणे आंदोलन ही आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसापासून सुरू केले आहे,त्याचाच एक भाग म्हणून उद्या गुरुवार दि.18/7/25 रोजी उदगीर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झालेल्या अन्यायाबद्दल जनतेत जागरूकी,माहिती साठी शहरातून रॅली सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असून उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या रॅलीत सहभागी होऊन पत्रकारावर झालेल्या अन्यायाबद्दल जनतेत सत्यता निर्माण करून द्यावी जेणे करून पुढील काळात पत्रकारावर असे दबाव घालण्यासाठी कोणीही येणार नाही,ज्यांनी पत्रकारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांना धडा शिकवल्या शिवाय आता पत्रकार गप्प बसणार नसल्याचे ही पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी सांगितले असून उद्या उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी सामील व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
दसऱ्या पूर्वी दसरा मैदानाची पाटी लावा, अन्यथा रस्त्यावर दसरा मेळावा साजरा करू :- सार्वजनिक दसरा महोत्सव समिती उदगीर 👉 300 वर्षा पूर्वी पासून ची परंपरा ,उदगीर शहराचा सामुदायिक दसरा गावच्या वेशीच्या बाहेर म्हणजे पुर्वी चे जिल्हा परिषद शाळा मैदान व आताचे तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येत असल्याने, गत वर्षी घोषणा केल्या प्रमाणे क्रीडा संकुलास त्वरित दसरा मैदान नाव द्यावे उदगीर= उदगीर येथील मागील 300 वर्षा पूर्वी पासून दसरा मेळावा हा जिल्हा परिषद मैदानावर होतो, गत वर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती ने तत्कालीन , पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांना निवेदन देऊन सदरील मैदानास दसरा मैदान नाव द्यावे अशी मागणी केली होती त्यास त्यांनी प्रतिसाद देऊन दसरा मेळाव्यात जिल्हा क्रीडा संकुलास दसरा मैदान म्हणून नाव देणार असे घोषित केले होते पण अद्याप त्याची पूर्तता झाली नसून दसरा मैदानाची पाटी दसऱ्या पूर्वी तेथे लावावी अन्यथा या वर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती दसरा मेळावा हा मुख्य सडकेवर साजरा करेल असा ठराव सार्वजनिक दसरा महोत्सव समिती च्या श्री शंकरलिंग महाराज मठ संस्थान येथे महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री सुखदेव स्वामी महाराज यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत संतोष कुलकर्णी, उध्दव महाराज हैबतपुरे ,ओमप्रकाश गर्जे, कैलास पाटील शरद पातेवार , सुधीर मिरजकर, श्याम ढगे, गर्जे निवृत्ती, वेदभुषन कालेकर, संजय इटग्याळकर, बालाजी ढगे, पांडू आपेट तुषार बुलबुले, अभिजीत पाटील, श्रीनिवास सोनी, बस्वराज बागबंदे, मनोज पुदाले, अविनाश रायचूरकर, बाबुराव पांढरे,सुभाष धनुरे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते करण्यात आला आहे,सोबत सर्व पालखी प्रमुखांनी वेळेत तेथे यावे असे आवाहन ही महोत्सव समिती तर्फे करण्यात आले