पीक विम्याच्या नावावर महा इ सेवा केंद्रा कडून शेतकऱ्याची लूट 👉 पीक विमा कंपनी देते सेवा केंद्रास 40 रू,परत शेतकऱ्यांकडून ही घेत आहेत 100,100 रू. उदगीर= उदगीर तालुक्यातील शेतकरी पाऊस नसल्याने पहिलेच त्रस्त असून आता पीक विमा भरण्यासाठी होणाऱ्या महा इ सेवा केंद्राच्या मनमानी ने शेतकरी वैतागले आहेत,शासनाची पीक विमा योजना म्हणजे महा इ सेवा केंद्राचे घर भरणे का? हा प्रश्न शेतकऱ्यास पडत आहे उदगीर तालुक्यात गत वर्षी 49105 शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून,या वर्षी या पेक्षाही जास्त शेतकरी पीक विमा भरण्यासाठी महा इ सेवा केंद्रावर चकरा मारत आहेत,या वर्षी शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने पहले तर शेतकऱ्यावर आर्थिक ताण पडत असून , हा विमा भरण्यासाठी महा इ सेवा केंद्रास विमा कंपनी प्रति 40 रू.देत असतानाही महा इ सेवा केंद्रावर शेतकऱ्यास लुटण्याचा धंदा सुरू असल्याचे शेतकरी बोलत असून ही हे महा इ सेवा केंद्र वाले शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 100 रू वसूल करत आहेत, 50 हजार शेतकरी शासन देते 40 रू,शेतकऱ्यांकडून 100 धरले तर 70 लाख रुपये उदगीर तालुक्यातून होणारी उलाढाल असल्याने या महा इ सेवा केंद्र वाल्याची मग्रुरी वाढत असल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी