रानमाळच्या तिर्रट जुगार अड्यावर परत पोलिसांची धाड; ३७ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल 👉 काही महिन्यापूर्वी ही धाड घालून अनेक जुगाऱ्यांना केले होते अटक 👉गेल्या अनेक दिवसापासून रानमाळ हॉटेल मोघा येथे कायदा धाब्यावर बसवुन मोठ्या प्रमाणावर जुगाराचा आंतर राज्जीय अड्डा सुरू होता. उदगीर, - गेल्या अनेक दिवसापासून रानमाळ हॉटेल मोघा (ता. उदगीर) येथे कायदा धाब्यावर बसवुन मोठ्या प्रमाणावर जुगाराचा आंतरराज्यीय अड्डा सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना मिळाली होती त्यावरुन त्यांनी दिलेल्या आदेशावरून रविवारी रात्री उदगीर ग्रामीण, शहर व देवणी पोलिसांच्या संयुक्त छाप्यात ३७ जणांवर गुन्हे दाखल करून पाच लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हॉटेल रानमाळ येथे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातील जुगारी संघटित होऊन लाखो रुपये उलाढालीचा जुगार अड्डा सुरु होता. याबाबत नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना कल्पना दिली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उदगीर व देवणीच्या पोलीस निरीक्षकांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या संयुक्त धाडीत जिल्हाधीकारी लातूर यांनी घालून दिलेल्या परवान्यातील नियम व अटींचे उल्लंघन करुन स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी वेळेची मर्यादा ओलांडुन , नियमांचा भंग करून तिर्रट नावाच जुगार पैशांवर खेळत व खेळवीत असताना आरोपीनी संघटीत गुन्हा करुन मुदेमालांसह मिळुन आल्याने पोलिस हवालदार पंडीत बजरंग गुणाले यांच्या फिर्यादीवरून आरोपी संजीवकुमार माधवराव बिरादार वय 45 वर्षे (रा.भालकी जि बिदर), श्रीकांत मनोहर खासेमपुरे यय-32 वर्षे (रा. जि. बिदर), पांडुरंग भिमराव धायगुडे वय-41 वर्षे (रा.कासारशिर्सी ता.निलंगा), नंदकुमार चंद्रकांत बेलाळे वय-37 वर्ष (रा. सुलतान बागवाडी ता. हुमनाबाद जि.बिदर), महादेव बाबुराव भसकले वय-26 वर्षे (रा. ता. जि. बिदर), रामेश्वर राजकुमार शटकार वय 20 वर्षे (रा. ता. भालका जि.बिदर) मेघराज आशोक पाटील वय-35 वर्ष (रा.बेरीबी ता.भालकी जि.बिदर), कैलाश रमेश पाटील यय-35 वर्ष (रा. भालकी जि. बिदर), राजकुमार रामचंद गौड वय-34 वर्षे (रा.हल्लाळी ता. भालकी), चंद्रकांत जगन्नाथ तळचाटे वय 42 वर्षे (रा.संतपुर ता.औराद) सन्बाऊदीन अहनदपाशा शेख वय-32 वर्षे (रा. संतपुर ता. औराद), चंद्रकांत गणपती पाटील वय 32 (रा. संतपुर ता. औराद जि.बिदर), कल्लपा धनराज तळघाटे वय 35 वर्ष (रा.संतपुर ता. औराद), बंडेप्पा घाळेप्पा कन्नाळे वय 50 वर्षे (रा.संतपुर ता.औराद), भन्यु शिवराज राजापुरे वय-42 वर्ष (रा. ता. भालकी) मारोती संगप्पा नळे वय-38 वर्षे (रा. वल्लेपुर ता.औराद जि. बिदर) अनिल कल्लप्पा दापके वय-45 (रा. जुन्नेखेरी ता. औराद जि. बिदर), महेश सिद्राम बिरादार वय-32 वर्षे (रा. नागराळ ता भालकी जि. बिदर), रविंद्र कल्लप्पा जिर्गे वय 35 वर्षे (रा. ऐकलर ता. औराद), गणेश मलिकार्जुन अंदुरे वय 34 वर्ष (रा. पाटोदा बु.ता. जळकोट), शरणप्पा बसप्पा रंजिरे वय-51 वर्ष (रा.सुलतानपुर ता. हुमनाबाद जि. बीदर), हानमंत विरशेटीअप्पा जानते वय-38 वर्षे (रा. सुलतानपुर ता. हुमनाबाद जि.बिदर) नरसिम्हा व्यंकया नहे वय-67 वर्ष (रा. काजीपल्ली हैद्राबाद), जयपाल व्यंकटराम रेडी वय-42 वर्ष (रा. जिलेलगुडा हैद्राबाद), भिम व्यंकटराव बुक्केबाड वय-36 वर्ष (रा. सावरगाव ता. देवणी), अर्जुन सुभाष विरादार वथ-35 वर्ष (रा. सावरगाव ता.देवणी), सहदेव श्रीधर बिरादार वय-27 वर्षे (रा.सावरगाव ता देवणी), खालेद गफारसाब कुरेशी वय-40 वर्ष (रा. उदगीर ता. उदगीर), राहुल आशोक कदम वय-35 वर्ष (रा.नालंदा नगर उदगीर), सत्यनारायण स्पेश व्ही. वयं 70 वर्ष (रा. गटकेसर ता. गटकेसर जि. रंगारेडी), हानमंत अशोक वारे वय 45 (रा मुखेड जि नांदेड), इ किरण कुमार वथ 40 वर्षे (रा कत्तापेठ जि हैद्रबाद), नयुन मेहबुबसाब शेख (वय-35 वर्षे (रा. बनशेळकीरोड उदगीर), चंद्रया एन वय 48 (रा. हैद्राबाद), प्रमोद विदयसागर धुमाळे, वजीर महेबुबसाब बंगाली (रा उदगीर), शिवाजी अण्णाराव नेमताबादे यांच्यावर मुंबई जुगार अधिनियमानुसार देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी रोख रक्कम 2 लाख 45,000, मोबाईल किंमत 2 लाख 74,500 रुपये असे किंमत अंदाजे 5 लाख 19,500 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी