*उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ०९ जुलै रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा* उदगीर : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर व उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता उदगीर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे हा रोजगार मेळावा होणार असून या मेळाव्यात रोजगार देणारे एकूण १० पेक्षा जास्त आस्थापना, उद्योजक यांनी ३३५ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. हैदराबाद येथील अमॅझॉन (केएल ग्रुप) मध्ये वेअरहाऊस असोशिएटच्या ७५ जागा भरण्यात येणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय, डिप्लोमा राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील साई मॅनपावर सर्व्हिसेसमध्ये ट्रेनीच्या ५० जागा भरण्यात येणार असून यासाठी बीएस्सी ॲग्री, बी.ई., बी.टेक, आयटीआय, ॲग्री डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील युनिक मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये ट्रेनीच्या ५० जागा भरल्या जाणार असून यासाठी आयटीआय (फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टर्नर, टिडीएम) ही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्लॅड मेटल इंडिया प्रा.लि. व संगकज इंडस्ट्री प्रा.लि.मध्ये ट्रेनीच्या ४५ जागा भरल्या जाणार असून यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशन, इलेक्ट्रॉनिक, आरएसी, टि.डी.एम अशी राहणार आहे. लातूर येथील इक्वीनॉक्स टेक्नोलॉजीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह, सर्व्हिस टेक्नीशिअन, वेल्डरच्या १५ जागा भरल्या जाणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय, डिप्लोमा (वेल्डर) अशी राहील. तसेच पुणे येथील तिरूमला फॅसिलिटी येथे ट्रेनीच्या ५० जागा भरल्या जाणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता आयटीआय अशी राहणार आहे. मुथुट मायक्रोफिन प्रा.लि.मध्ये फिल्ड ऑफिसरच्या २० जागा भरण्यात येणार असून यासाठीची शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी, कोणतीही पदवी, आयटीआय राहील. लातूर येथील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या उदगीर शाखेत बिमा सल्लागारच्या १० जागा भरण्यात येणार असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उदगीर येथील एसबीआय लाईफ इन्शुरन्समध्ये डेव्हलपमेंट मॅनेजर, लाईफ मित्राच्या १० जागा भरल्या जाणार असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी अशी शैक्षणिक पात्रता राहील. लातूर येथील क्रेडिट ॲक्सीस ग्रामिण लि.मध्ये रिलेशनशिप ऑफिसरच्या १० जागा भरण्यात येणार असून पदवीधारक उमेदवार यासाठी पात्र राहतील. रिक्तपदे निहाय इच्छुक उमेदवारांनी ९ जुलै, २०२५ रोजी सकाळी १० वाजता उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीच्या पाच प्रतीसह उपस्थित रहावे. या संधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या ०२३८२- २९९४६२ दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
• श्रीनिवास मदनलाल सोनी