उदगिरात लोकशाही चा बोजवारा ,नौकरशाही चा बोलबाला? 👉 नेता गप्प ,गायब विरोधक,सामान्य जनता परेशान उदगीर:-उदगीर तालुका एक ऐतिहासिक ,शैक्षणिक,लोकशाही जपणारा तालुका असताना आता या तालुक्यातून लोकशाही चा अस्त होऊन नोकरशाही चा उदय झाल्याचे चित्र सध्या अनेक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याच्या वर्तनावरून दिसत असल्याचे लोक बोलत आहेत उदगीर तालुक्यात सध्या लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न अनेक मान्यवरराणा पडत असून कुठल्याही शासकीय कार्यालयात जावा तेथील अधिकाऱ्याचे वागणे हे नोकरशाही अवतरली की काय हा प्रश्न उपस्थित होतो,पहले तर अधिकारी भेटत नाहीत,कर्मचाऱ्याचे एकच उत्तर साहेब दौऱ्यावर,दुसरी बाब कुठलीही तक्रार करा यांना माहीत असते की यांच्यात आपला कर्मचारी,अधिकारी अडकणार असल्याने तक्रारदारास साधे दोन ओळीचे उत्तर ही देणे योग्य समजत नाहीत,सध्या अशी परिस्थिती दिसते की अधिकारी,कर्मचारी आपला खिसा कसा गरम होईल हे पाहत आहेत,दुसरीकडे दलालांनी कार्यालयाचा ताबा घेतला की काय हा प्रश्न उपस्थित होतो आहे,कारण की दलालाशिवाय काम होणे अश्यक,अनेक कार्यालयातील अधिकारी कार्यालयात कमी घरी जास्त फाईल हाताळत असल्याची चर्चा असून,मागील काळात नेत्याचा दबदबा अधिकाऱ्यावर असायचा,विरोधी पक्ष सक्षम असायचा पण सध्या नेत्याचा दबदबा दिसत नाही तर विरोधी पक्षच शिल्लक नसल्याने अधिकाऱ्याचे फावत असून तालुक्यात लोकशाही चा बोजवारा,नोकरशाही चा बोलबाला चे चित्र दिसत असल्याने जनता मात्र त्रस्त दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी