उदगीर चे प्रवासी वाऱ्यावर? येथील बसेस कोकणवासीयांच्या दिमतीला 👉 उदगीर आगाराच्या 123 पैकी 48 बसेस कोकणात 👉 कोकणात गणपती मग उदगीरात शिमगा असतो का ? उदगीर= उदगीर आगारात पहिलेच बसेस ची कमतरता असताना महामंडळाने उदगीर आगाराच्या 123 बसेस पैकी 48 बसेस कोकणवासीयांना गणपती साठी पाठवण्यात आल्या असल्याने उदगीर आगारातून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द झाल्याने ऐन गणपती काळात प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे,कोकणात गणपती असतो मग उदगीरात काय शिमगा असतो का अशी भावना प्रवासी व्यक्त करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
