पोलिस अधीक्षकांनी नप मुख्याधिकाऱ्याचे कान टोचताच उदगीर चा मुख्य रस्ता झाला बॅनर मुक्त उदगीर:- काल शांतता समिती बैठकीत पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी रस्त्यावरील बॅनर बाबत मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांचे कान टोचताच उदगीर शहरातील अनाधिकृत होल्डिंग्स व बॅनर निष्कासित करण्याची मोहीम आज दि 22.825 रोजी सकाळी 6.00वाजेपासून दुपारी1.00 वाजेपर्यंत राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 15 अनाधिकृत होल्डिंग्स व 20 मुद्दत बाह्य बॅनर निष्कासित करण्यात आले.या मोहिमेत मालमत्ता विभाग प्रमुख,महेश कवठे, संजय क्षीरसागर, महादेव हुडगे, अतिक्रमण विभागाचे, विनोद रंगवाळ व कर्मचारी यांनी काम केले, काल शांतता समिती च्या बैठकीत पोलिस अधीक्षक यांनी रस्त्यावरील बॅनर मुळे शहर कसे बकाल होत आहे हे सांगून मुख्याधिकाऱ्याचे कान टोचले होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
