सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपत्तीग्रस्तांना व्यापारी बांधवाकडून मदतीचा हात - शिवाजीराव हुडे :- शेतकऱ्याचे भिजलेले सोयाबीन ही योग्य भावात खरेदी करणार उदगीर = उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगाव या दोन गावांमध्ये अतिवृष्टी होऊन नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बळीराजाच्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या पोळा या सणाच्या पूर्वसंध्येला मोठी नैसर्गिक आपत्ती या दोन्ही गावावर आल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत उदगीर येथील सचिन इंटरनॅशनल प्रोटीन्स प्रायव्हेट लिमिटेड, नारायणा ऍग्रो ऑइल प्रायव्हेट लिमिटेड, वैशाली ऍग्रो सोया प्रॉडक्ट, दाल मिल असोसिएशन उदगीर आणि आडत व्यापारी वेल्फेअर असोसिएशन उदगीर या संस्था आणि संघटनाच्या वतीने या दोन्ही गावातील गरजू आणि नैसर्गिक आपत्तीने अडचणीत आलेल्या जनतेला फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण मदत केली पाहिजे असे आवाहन केल्याबरोबर सर्व संघटनांनी आणि संस्थांनी पुढाकार घेऊन अर्थसाह्य करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे आपल्याला हे सहज शक्य झाले असे विचार उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव हुडे यांनी व्यक्त केले. उदगीर तालुक्यातील बोरगाव आणि धडकनाळ या गावातील गरजू लोकांना अर्थसाह्य केल्यानंतर शिवाजीराव हुडे बोलत होते. याप्रसंगी प्रत्यक्ष अर्थसाह्य देताना स्वतः शिवाजीराव हुडे, संदीप मुक्कावार, सागर महाजन, संदीप शिवाजीराव हुडे, दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंडे, निजवंते सावकार, लक्ष्मीकांत चिकटवार, संतोष मलगे, आदिनाथ कोरे, दत्ता बिरादार, वैजनाथ बिरादार, विनोद टवानी, कल्पेश बाहेती, ज्ञानेश्वर पंदीलवार, कोंडीराम काळोजी, बाळू लासूणे, मल्लिकार्जुन काळगापुरे, पी पी पाटील, श्रीधर बिरादार, दिलीप पाटील, बबलू काळगापुरे, अंकुश बिरादार, चंद्रकांत टेंगेटोल, लकी पाटील, नागेश आंबेगावे, शिवशंकर बिरादार, जगदीश बाहेती, रवींद्र कोरे, शिवा पेठे, साईनाथ कल्याणी, मनोहर बिरादार, मारुती कडेवार, मुन्ना पेन्सिलवार इत्यादी प्रमुख व्यापारी बंधूंनी उपस्थित राहून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून गरजूंना सण साजरा करण्यासाठी अर्थसहाय्य केले. उदगीरच्या व्यापारी बांधवांनी आपल्या सुखदुःखात सहभागी होत आपल्याला अर्थसहाय्य केल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उदगीरच्या व्यापारी बांधवांचे आभार व्यक्त केले आहेत. अतिवृष्टी झाल्यामुळे सणाच्या पूर्वसंध्येला पूर आल्याने अनेक जनावरे वाहून गेली आहेत, शेतातील पीकच नव्हे तर माती देखील वाहून गेली आहे. शेती खरवडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरे कोसळली आहेत, घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याची नासाडी झाली आहे. अनेक गरीब झोपडी धारकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत उदगीर येथील अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन संसार उपयोगी साहित्याचे, अन्नधान्याचे कीट वाटप करून मदतीचा हात दिला आहे. असे असले तरीही सण साजरा करण्यासाठी ग्रामीण लोकांना अर्थसाह्य करणे गरजेचे आहे असे वाटल्यावरून, शिवाजीराव हुडे यांच्या पुढाकारातून दोन्ही गावात मिळून जवळपास 87 गरजवंतांना अर्थसाह्य करण्यात आले. ही मदत करत असताना कोणताही राजकीय भेदभाव किंवा कोणता स्वार्थ न ठेवता व्यापारी बांधवांनी पुढाकार घेऊन समाज बांधवांना केलेले सहकार्य हे लाख मोलाचे असल्याचेही शिवाजीराव हुडे यांनी स्पष्ट केले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

