शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका सात हजार रुपयाची लाच घेताना अडकली जाळ्यात उदगीर - बोरताळा पाटी, देगलुर रोड, उदगीर येथील शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका यांना सात हजार रुपयाची लाच घेताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसाकडुन मिळालेली माहीती आशी की, तक्रारदार यांनी काही खाजगी अडचणीमुळे ईयत्ता ९ वी मध्ये शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यानंतर तक्रारदार याना पुढील नौकरीसाठी व व्यवसायासाठी १० वी व त्यापुढील शिक्षण घेणे गरजेचे असल्याने, ता. ६ ऑगस्ट रोजी शंकर माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका त्रिविणी शेरे यांना भेटले. त्यावेळी मुख्याध्यापिका शेरे त्रिविणी यांनी १० वी वर्गात प्रवेश देण्यासाठी दहा हजार रूपयाची लाचेची मागणी केलेबाबत तक्रारदार यांची लाचलुचपत प्रतिबंधक लेखी तक्रार दिली. यावरुन सापळा रचुन आरोपी श्रीमती त्रिवेनि बबुराव शेरे, (वय ४१) प्रभारी मुख्याधापिका शंकर माध्यमीक अश्रमशाळा बोरताळा पाटी, देगलुर रोड उदगीर यांनी तक्रारदार यांचेकडून सात हजार रुपये लाचेची रक्कम त्यांचे कार्यालयामध्ये पंच साक्षीदारा समक्ष स्वतः स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधीत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपअधिक्षक संतोष बर्गे पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, पोलीस कॉस्टेबल किरण गंभीरे, मंगेश कोंडरे, हवलदार श्री.अलुरे, महिला पोलीस कर्मचारी पठाण यांच्या पथकाने सापळा रचुन कार्यवाही करण्यात आली आहे. या घटने वरून एक लक्षात येते की आता शिक्षण विभाग ही लाच घेण्यात मागे नाही
• श्रीनिवास मदनलाल सोनी