पावसात खड्डे बुजवण्याची टेक्नॉलॉजी पाहून उदगीरकर हैराण! उदगीर:- उदगीर येथील जाकीर हुसेन चौक(उमा चौक)येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम भर पावसात चालू असल्याने ही खड्डे बुजवण्याची टेक्नॉलॉजी बाहेर जाऊ देऊ नका अशी चर्चा उदगीरकर करत असून या नवीन टेक्नॉलॉजी चे जनक जे कोणी अभियंते,ठेकदार असतील त्यांना खरे तर मोठा पुरस्कार देऊन ही सत्कार करावा अशी ही चर्चा सोसियल मीडियावर सुरू आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
