हंचनाळ ता.देवणी च्या वि. वि.का.सोसायटीच्या चेअरमन पदी शितल पाटील तर व्हॉईस चेअरमन पदी श्रीनिवास सोनी यांची बिनविरोध निवड 👉 निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटराव कदरे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन शिवणखेडे यांनी पाहिले काम उदगीर=देवणी तालुक्यातील हंचनाळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे ची निवडणूक बिनविरोध पाड पडून 12 संचालक बिनविरोध निवडून आले होते,आज गुरुवार 4/9/2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटराव कदरे यांनी चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन निवडीसाठी संस्थे ची विशेष बैठक त्यांच्या अध्यक्षते खाली बोलावली होती त्यात नूतन 12 सदस्य सोनी श्रीनिवास मदनलाल, बिरादार संतोष बाबूराव, बिरादार शितल शिवाजीराव, बिरादार राजकुमार केशवराव, बिरादार पांडुरंग मारोतीराव ,बिरादार बालाजी माधवराव,कोनाळे शिवाजी वामनराव,पाटील लक्ष्मण धोंडीबा महिला संचालक म्हणून बिरादार राजाबाई तानाजीराव,बिरादार सुरेखा निळकंठराव,अनुसूचित जाती,जमाती महिला संचालक सुर्यवंशी जानकाबाई सुधाकर तर भटक्या विमुक्त जाती,जमाती महिला संचालक म्हणून सोनाळे मनिषा बाबुराव हे सर्व उपस्थित होते त्यांनी एकमताने चेअरमन पदी शितल शिवाजीराव पाटील यांची तर व्हॉईस चेअरमन पदी श्रीनिवास मदनलाल सोनी यांची निवड केली,निवडणूक निर्णय अधिकारी कदरे यांनी चेअरमन, व्हॉईस चेअरमन यांची बिनविरोध निवड घोषित करून त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटराव कदरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन शिवणखेडे,गावातील प्रतिष्ठित केशवराव बिरादार,सुभाष गिरी,गोपाळराव बिरादार, उत्तमराव बिरादार,हणमंतराव बिरादार,रमेश म्हेत्रे, बालाजी गिरी, बब्रुवान मुंजेवार,मधुकर बिरादार, निळकंठ बिरादार, गोविंद खोंडे, श्रीरंग बिरादार, गुणवंत बिरादार, तानाजी बिरादार,विश्वनाथ गायकवाड सह गावातील अनेक मान्यवर उपस्थित राहून नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले , या वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटराव कदरे यांनी सदरील संस्था बिनविरोध केल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन करून नूतन संचालक मंडळ गावाच्या विकासासाठी काम करून संस्थे चे नावं करतील यांना आमच्याकडून जी काही मदत लागेल ती मी पूर्ण करेन असे आश्वासन दिले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
