*नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ* उदगीर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार असून काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचार देखील मोफत केले जाणार आहेत. जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ होईल. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील. उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्र रुग्णालये व विविध सामाजिक संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी होणार आहे. तळागाळातील नागरिकांसाठी मोठा दिलासा नेत्ररोग उपचाराचा खर्च गरीब नागरिकांच्या खिशाला परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळण्याचा मार्ग या उपक्रमातून खुला होणार आहे. या उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहचण्याकरिता सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. यामुळे लाखो रूग्णांवर मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियेसह औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिराचा लाभ राज्यातील गरजू रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
Popular posts
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
उद्याच्या आंदोलनात उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी सामील होऊन पत्रकारावर अन्याय केलेल्या डॉक्टरांना धडा शिकवा = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= येथील दोन पत्रकारांवर डॉक्टरांनी वीस, वीस कोटी रुपयांची अब्रु नुकसानीची नोटीस बजावली असून त्यांनी हे त्यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी केलेले कृत्य असून अशा नोटीसीला पत्रकार भीक घालणार नसून या डॉक्टरांनी जे अवैध्य दवाखाने स्थापन केले आहेत ते जोपर्यंत जमीनदोस्त होणार नाही तोपर्यंत उदगीर तालुक्यातील पत्रकार शांत बसणार नसून शहरात दररोज नवनवीन आंदोलन करत नगर पालिकेत मुख्याधिकारी दालनात बोंब मारो सह धरणे आंदोलन ही आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसापासून सुरू केले आहे,त्याचाच एक भाग म्हणून उद्या गुरुवार दि.18/7/25 रोजी उदगीर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झालेल्या अन्यायाबद्दल जनतेत जागरूकी,माहिती साठी शहरातून रॅली सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असून उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या रॅलीत सहभागी होऊन पत्रकारावर झालेल्या अन्यायाबद्दल जनतेत सत्यता निर्माण करून द्यावी जेणे करून पुढील काळात पत्रकारावर असे दबाव घालण्यासाठी कोणीही येणार नाही,ज्यांनी पत्रकारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांना धडा शिकवल्या शिवाय आता पत्रकार गप्प बसणार नसल्याचे ही पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी सांगितले असून उद्या उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी सामील व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
दसऱ्या पूर्वी दसरा मैदानाची पाटी लावा, अन्यथा रस्त्यावर दसरा मेळावा साजरा करू :- सार्वजनिक दसरा महोत्सव समिती उदगीर 👉 300 वर्षा पूर्वी पासून ची परंपरा ,उदगीर शहराचा सामुदायिक दसरा गावच्या वेशीच्या बाहेर म्हणजे पुर्वी चे जिल्हा परिषद शाळा मैदान व आताचे तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येत असल्याने, गत वर्षी घोषणा केल्या प्रमाणे क्रीडा संकुलास त्वरित दसरा मैदान नाव द्यावे उदगीर= उदगीर येथील मागील 300 वर्षा पूर्वी पासून दसरा मेळावा हा जिल्हा परिषद मैदानावर होतो, गत वर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती ने तत्कालीन , पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांना निवेदन देऊन सदरील मैदानास दसरा मैदान नाव द्यावे अशी मागणी केली होती त्यास त्यांनी प्रतिसाद देऊन दसरा मेळाव्यात जिल्हा क्रीडा संकुलास दसरा मैदान म्हणून नाव देणार असे घोषित केले होते पण अद्याप त्याची पूर्तता झाली नसून दसरा मैदानाची पाटी दसऱ्या पूर्वी तेथे लावावी अन्यथा या वर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती दसरा मेळावा हा मुख्य सडकेवर साजरा करेल असा ठराव सार्वजनिक दसरा महोत्सव समिती च्या श्री शंकरलिंग महाराज मठ संस्थान येथे महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री सुखदेव स्वामी महाराज यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत संतोष कुलकर्णी, उध्दव महाराज हैबतपुरे ,ओमप्रकाश गर्जे, कैलास पाटील शरद पातेवार , सुधीर मिरजकर, श्याम ढगे, गर्जे निवृत्ती, वेदभुषन कालेकर, संजय इटग्याळकर, बालाजी ढगे, पांडू आपेट तुषार बुलबुले, अभिजीत पाटील, श्रीनिवास सोनी, बस्वराज बागबंदे, मनोज पुदाले, अविनाश रायचूरकर, बाबुराव पांढरे,सुभाष धनुरे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते करण्यात आला आहे,सोबत सर्व पालखी प्रमुखांनी वेळेत तेथे यावे असे आवाहन ही महोत्सव समिती तर्फे करण्यात आले