पत्रकार करणारं मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसापासून बोंब मारो,धरणे आंदोलन उदगीर:- पत्रकारावर आपले वर्चस्व,दबाव घालण्यासाठी व आपले कुणी वाकड करू शकत नाहीत या अविर्भावात दोन डॉक्टरांनी शहरातील दोन पत्रकारांना ४० कोटी रुपयाच्या रुपये नुकसान भरपाई ची नोटीस दिली खरी, पण हा त्यांचा डाव आता डॉक्टरवरच उलटणार असे दिसत आहे . कारण की ज्या दोन डॉक्टरांनी पत्रकारांना नुकसान भरपाई देण्यासाठी नोटीस दिली त्यांचेच दवाखाने आता अवैध्य बांधकाम असल्याची चर्चा सुरू आहे . नोटीस पाठवणाऱ्या डॉक्टराच्या विरोधात आता पत्रकारांनी सुद्धा दंड थोपटले आहेत त्यांच्या अवैध्य बांधकामाविरुद्ध तक्रार केली .पालिका प्रशासन कागदी घोडे नाचवत असल्याने पत्रकारांनी ब्रह्मास्त्र उपसले असून मराठवाडा मुक्ती संग्राम दीन म्हणजेच १७ सप्टेंबर २०२५ पासून दररोज नप मुख्याधिकारी यांच्या दालनात बोंब मारत धरणे आंदोलन करणार आहेत .त्या दवाखान्याचे अवैध बांधकाम पाडावे या मागणीसाठी आता आंदोलन करणार आहेत .नगरपालिकेने त्या डॉक्टरांना तीन दिवसाची नोटीस दिली,त्याची ही मुदत संपल्याने पालिका प्रशासनाच्या कारवाईची वाट न पाहता पत्रकार मराठवाडा मुक्ती संग्राम दीन म्हणजेच १७ सप्टेंबर पासून दररोज नगर पालीकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात बोंब मारत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी, नप मुख्याधिकारी , पोलिस निरीक्षक यांना दिली आहे .
• श्रीनिवास मदनलाल सोनी
